हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्र विचित्र फॅशन करून सोशल मीडियावर आपले विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करणारी उर्फी जावेद कितीही ट्रोल झाली तरी थांबायचं काही नाव घेत नाही. तिची फॅशन तिच्यापुरता जगात भारी असली तरीही जगातील प्रत्येकाला ती आवडेलच असे नाही. तिच्या बोल्ड अवतारांमुळे अनेकदा नेटकरी संतापलेले पहायला मिळाले. अलीकडेच दिल्लीमध्ये तिच्याविरोधात काही संस्थांनी आवाज उठवीत तिच्यावर गुन्हा नोंद करण्यासाठी पुढाकार घेतला होता. यानंतर आता सातारा जिल्ह्यातील महालक्ष्मी आधार फाउंडेशन तिच्याविरोधात सक्रिय झाले आहे. या फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी थेट मुख्यमंत्री पोलीस महासंचालक, महायुक्त कमिशनर, आयजी, एसपी यांना मेलद्वारे हे निवेदन पाठवले आहे.
माहितीनुसार, महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी आज उर्फी जावेदविरोधात अश्लील फोटो आणि व्हिडिओज तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे निवेदन सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना दिले आहे. सोशल मीडियावर मॉडेल उर्फी जावेद आक्षेपार्ह, अगदी तोकडे कपडे घालून विचित्र प्रकारे देह प्रदर्शन करीत असून सामाजिक भान न ठेवता अंग प्रदर्शन करीत असल्याने लहान मुलांवर व युवापिढीवर होत असलेला परिणाम व अत्याचार याबाबत गुन्हा नोंद करावा असे या निवेदनात म्हटले आहे. Urfi Javed
सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद हि महिला भारतीय संस्कृतीचे उल्लंघन करून उघड उघड देह प्रदर्शन करीत आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली देह प्रदर्शन करून तिने उच्छाद मांडला आहे. सदर महिला दैनंदिन सोशल मीडियावर अंग प्रदर्शन करून व्हिडिओ अपलोड करीत असते. या प्रदर्शनामुळे सामाजिक भान हरपले आहे.
लहान मुलांवर त्याचा प्रचंड परिणाम होत आहे. अंगाचे अश्लील चाळे करणे, देह प्रदर्शन करणे, कमी कपडे घालून देह दाखवणे यामुळे येणारे जाणारे, तसेच सोशल मीडियावरील संपूर्ण महिला वर्गास मान खाली घालायला लागत आहे. याबाबत सदर महिलेस जाब विचारून वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. Urfi Javed
Discussion about this post