हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आतापर्यंत अनेक दर्जात्मक कलाकृती सादर केल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील त्यांचे योगदान वाखडण्याजोगे आहे. कारण नाटक, मालिका आणि विविध चित्रपटांमधून ते समाज भान राखत असतातच. शिवाय आजोबा शाहीर साबळे यांचा लोककलेचा वारसाही ते जपत आहेत. सध्या ते आजोबा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रतील विविध भागात सुरु झाले आहे. तत्पूर्वी देवाचा आशीर्वाद घेतल्याचे केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे.
अभिनेता, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे कि, || शुभ आरंभ || कुठल्याही लोक कलेची सुरुवात गणाने होते.. गण म्हणजे काय तर गणेशाला आळवून त्याचा आशिर्वाद घेणे.. त्याच परंपरेला अनुसरून महाराष्ट्र शाहीरच्या संपूर्ण संहितेची पूजा करून आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या देवस्थानांना भेटी दिल्या.. लोकेशन पाहण्यासाठी जिथे जिथे गेलो तिथल्या मंदिरांना भेटी देऊन ह्या नवीन आरंभाची नांदी केली..
आमच्या ह्या प्रवासात तुम्ही सुद्धा सोबती आहात म्हणूनच त्यातील ही काही क्षणचित्रे तुमच्या सोबत आम्ही शेअर करतोय.. आणि ह्या डिजिटल माध्यमातून ही संहिता तुमच्या पुढ्यात ठेवून तुमच्या कडूनही शुभेच्छांची मागणी करतोय.. कारण कितीही झालं तरी आम्हा कलाकारांसाठी माय बाप रसिक प्रेक्षक हे सुद्धा देवच.. लोभ असू द्या.. भेटूया सिनेमागृहात २८ एप्रिल २०२३ रोजी..
महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांचे साताऱ्याशी आत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. ते स्वतः वाई तालुक्याचे असल्यामूळे त्यांचे बालपण आणि पुढे बराचसा काळ त्यांनी साताऱ्यात घालवला आहे. यामुळे त्यांचा जीवनपट करताना केदार शिंदे यांनी आवर्जून त्या प्रत्येक ठिकाणी पायपीट केली होती.
मुख्य म्हणजे त्यासाठी केदार शिंदे साताऱ्याच्या दौऱ्यावर देखील येऊन गेले. या शोधात त्यांच्यासोबत चित्रपटाची संपूर्ण टीमसुद्धा होती. यावेळी त्यांनी अनेक लोकेशन पाहिली. त्यातली काही ठिकाणं अंतिम केली आणि या प्रत्येक ठिकाणी जात असताना जिथे जिथे मंदिरं दिसली तिथे तिथे नतमस्तक झाले. यानंतर आता अखेर एका प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या जीवनपटाचे शूटिंग सुरु झाले आहे. माहितीनुसार, साताऱ्यातील वाई तालुक्यात या चित्रपटाचा बराच भाग चित्रित केला जाणार आहे.
Discussion about this post