हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। औरंग्याच्या घाणेरड्या नजरेपासून स्वराज्याला वाचविण्यासाठी अनेक वीरांगना देखील या लढ्यात सामील झाल्या होत्या. या मर्दानी स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या गाथा आणि ओव्या आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गायल्या जातात. मराठ्यांचा देदीप्यमान संग्रामाला हळदी कुंकवाचंही लेणं होत म्हणून आज स्वराज्यात मानानं स्त्रिया जगतात. या पराक्रमी वीरांगनांमध्ये ‘महाराणी छत्रपती ताराबाई’ यांचेही नाव आदराने घेतले जाते. यामुळे त्यांचाही इतिहास जगताला माहित व्हावा म्हणून ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा चतुरपट लवकरच येत आहे. या चित्रपटाचा आज मुहूर्त संपन्न झाला आहे.
माहितीनुसार, या चित्रपटात छत्रपती ताराराणींची मुख्य व्यक्तिरेखा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. तर हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथावर आधारीत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांनी लिहिले आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचा भव्य दिव्या शूटिंग सेट मुंबईमध्ये चित्रनगरीत उभारण्यात आला आहे. ‘प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि ‘मंत्रा व्हिजन’ निर्मित हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती दिली जात आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले कि, ‘जेव्हापासून हा चित्रपट येतोय अशी घोषणा केली तेव्हा पासूनच तांत्रिक टीम पासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटासाठी स्वतःला झोकून दिले आहे. इतक्या दिवसाचं अभ्यास, वर्कशॉप, प्री वर्क ही सर्व तयारी केल्यानंतर अखेर हा चित्रपट चित्रीकरणासाठी सज्ज झालाय. सेटवर येण्याआधी सगळ्या टीमने आपापल्या विभागामध्ये प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून, हा चित्रपट सर्वोत्तम कसा करता येईल, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण टीम या विषयाला आणि चित्रपटाला योग्य न्याय देतील, यात काहीच शंका नाही. मला आनंद आहे की सोनालीसारखी गुणी अभिनेत्री ही मुख्य भूमिका साकारणार आहे. धाडस आणि शौर्य यांचे असामान्य असे मिश्रण असणाऱ्या छत्रपती ताराराणींचा अज्ञात प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा हा आमच्या संपूर्ण टीमचा उद्देश आहे.’
Discussion about this post