हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हॉलिवूडच्या हरी पॉटर या सीरिजने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला. हि एक अशी सिरीज आहे जिचे असंख्य चाहते आहेत. या चित्रपटाने विविध भाषिक प्रेक्षकांना आकर्षित केले आणि अक्षरशः सगळ्यांना वेड लावले. मुख्य म्हणजे ‘हॅरी पॉटर’ या सिरीजची क्रेझ अजुनही कायम आहे. अशी हि ‘हॅरी पॉटर’ सीरिज लिहून जे के रोलिंगने अब्जो कमावले आणि जगप्रसिद्ध चित्रपटांच्या यादीत आपली सिरीज नेऊन ठेवली. अशा या लोकप्रिय सिरीजबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अशी कि, आता बॉलीवूडमध्येदेखील ‘हॅरी पॉटर’चा नवा अविष्कार येणार आहे.
होय. हरी पॉटर या जगप्रसिद्ध सिरीजचा भारतीय अविष्कार येण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन फँटसी हॅरी पॉटर हि सिरीज साऱ्या जगभर प्रसिद्ध आहे आणि या सिरीजचा भला मोठा प्रेक्षकवर्ग भारतातून आहे. त्यामुळे हि सिरीज आता भारतीय शैलीतला एक नवा अविष्कार ठरणार आहे. यापूर्वीसुद्धा बॉलीवूडमधून हॅरी पॉटरचा रिमेक बनविण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यांना काही यश आले नाही. असं असतानासुद्धा आता बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी आता हॅरी पॉटरची भारतीय सिरीज बनविण्याचे ठरवले आहे.
या माहितीनंतर ‘हॅरी पॉटर’ सीरिजच्या चाहत्यांची उत्सुकता खूप वाढली आहे. आता शेखर कपूर यांनी ‘हॅरी पॉटर’वर एक बिग बजेट प्रोजेक्ट करण्याचे योजिले असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत मिस्टर इंडिया, बँडिट क्विन सारख्या चित्रपटांची निर्मिती करून त्यांनी आपली छाप इंडस्ट्रीवर पाडली आहे. यानंतर आता हॅरी पॉटरची सिरीज घेऊन ते येत आहेत. एका मुलाखतीदरम्यान कपूर यांनी म्हटले कि, ‘आतापर्यंत मी अनेक सिनेमे केले पण आता मला एक वेगळा प्रोजेक्ट करायचा आहे. जो हॅरी पॉटरवर आधारित आहे. तो आपला इंडियन हॅरी पॉटर असेल. मी काय हॅरी पॉटर नाही करणार. आपल्या भारतामध्ये देखील त्या आधारावर बऱ्याचशा कथा आहेत त्यांना समोर आणणार आहे. त्याचे स्वरुप हे त्या हॅरी पॉटरसारखे असेल. भारतामध्ये अशा चित्रपटांचा प्रेक्षक आहे. त्यामुळे येत्या काळात ते बनविण्यासाठी मी उत्सुक आहे’.
Discussion about this post