हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| गेल्या अनेक दिवसांपासून ज्याच्या त्याच्या तोंडात एकाच चित्रपटाचे नाव आहे. तो चित्रपट म्हणजे पुष्पा – द राईज. बॉक्स ऑफिसवर कल्ला केल्यानंतर हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. याशिवाय आणखी असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी IMDB वर डंका केला आहे. जाणून घेऊया साऊथच्या अशाच पाच सर्वोत्तम चित्रपटांबद्दल.
१) कुरुप IMDb रेटिंग- 7.4
– श्रीनाथ राजेंद्रानी दिग्दर्शित मल्याळम चित्रपट कुरुप हा हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये डब होऊन प्रदर्शित झाला आहे. यामध्ये दुल्कर सलमान, शाइन टॉम चाको, शोभिता धुलिपाला, इंद्रजित सुकुमारन, टोविनो थॉमस, माया मेनन आणि विजयकुमार प्रभाकरन यांसारखे दाक्षिणात्य कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सुकुमार कुरूप नावाच्या व्यक्तीने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचे नाटक केले होते या कथानकावर हा चित्रपट आधारित आहे.
२) जय भीम IMDb रेटिंग- 9.4
– टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित ‘जय भीम’मध्ये साऊथचा सुपरस्टार सुर्या मुख्य भूमिकेत आहे. शिवाय लिजोमोल जोस, के मणिकंदन, राजीषा विजयन, राव रमेश आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रा यांच्या प्रसिद्ध खटल्यावर आधारित आहे, जो त्यांनी त्यांच्या वकिलीच्या काळात लढला होता. हे प्रकरण कुरवा जमातीच्या लोकांच्या छळाचे होते.
३) मिन्नल मुरली IMDb रेटिंग- 8.3
– बेसिल जोसेफ दिग्दर्शित देसी सुपरहिरो चित्रपट ‘मिनाल मुरली’ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होत आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचा हा चित्रपट आहे. ज्यामध्ये टोविनो थॉमस, गुरु सोमसुंदरम, फेमिना जॉर्ज, अजू वर्गीस, शेली किशोर, बैजू संतोष आणि हरिश्री अशोकन यांसारखे कलाकार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सोफिया पॉल यांनी केली आहे, तर कथा आणि पटकथा अरुण अनिरुधन आणि जस्टिन मॅथ्यू यांनी लिहिली आहे.
४) मास्टर IMDb रेटिंग- 7.8
– लोकेश कांगराज दिग्दर्शित ‘मास्टर’ चित्रपटात मालविका मोहनन, शंतनू भाग्यराज, अर्जुन दास, आंद्रिया आणि नस्सर यांच्यासह दक्षिण चित्रपटसृष्टीतील दोन मोठे सुपरस्टार विजय आणि विजय सेतुपती आहेत. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून एका मद्यपी प्राध्यापकाच्या जीवनाभोवती फिरणारे कथानक आहे. हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला.
५) कर्णन IMDb रेटिंग- 8.2
– मारी सेल्वाराज दिग्दर्शित ‘कर्णन’ चित्रपटामध्ये धनुष, लाल पॉल, योगी बाबू, नटराजन सुब्रमण्यम, राजिषा विजयन, गौरी जी किशन आणि लक्ष्मी प्रिया चंद्रमौली हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कर्णन हा चित्रपट एक चळवळ आहे. सर्व माणसे समान हक्काने जन्माला येतात असे मानणाऱ्यांसाठी एक वेक अप कॉल म्हणजे हा चित्रपट. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
Discussion about this post