हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर अनेकांनी रोख लावण्याची मागणी केली होती. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचे कथानक सत्य घटनांच्या अगदी उलट आहे. शिवाय यात गंगुबाईंचा कथानकातून अपमान केला आहे. असा आरोप गंगुबाईंच्या समर्थकांनी आणि मुख्य म्हणजे कुटुंबाने चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साली यांच्यावर केला आहे. यानंतर चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी न्यायालयाने निर्णय दिला. या निर्णयामुळे आज सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला असून निर्मात्यांना दिला मिळाला आहे.
गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट अखेर आज रिलीज झाला आहे. हा चित्रपट मुंबईच्या रेड लाईट एरिया कामाठीपुरा येथील अत्यंत प्रभावशाली महिलेच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकाकर्ता भक्कम केस मांडू शकला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. हि याचिका गंगूबाईचा दत्तक मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केली होती. या चित्रपटात गंगूबाईंचा अपमान करण्यात आल्याचे त्याने म्हटले होते. प्रत्युत्तरात, युक्तिवाद करताना निर्मात्यांनी सांगितले कि, याचिकाकर्त्यांकडे गंगूबाईचा दत्तक मुलगा असल्याचा कोणताही पुरावा नाही. इतर कोणत्याही कागदपत्रात ना शाळेचा दाखला, ना रेशनकार्ड वा नाव नाही.
Soaring at the @berlinale 🙏
ADVANCE BOOKINGS OPEN NOW @bookmyshow : https://t.co/3OsXEHoAna#GangubaiKathiawadi in cinemas THIS FRIDAY#SanjayLeelaBhansali @aliaa08 @ajaydevgn @shantanum07 @prerna982 @jayantilalgada @PenMovies @saregamaglobal pic.twitter.com/m8pjUKDb1v— BhansaliProductions (@bhansali_produc) February 23, 2022
याचिकाकर्त्याचे बाबूजी शाह असे नाव असून. याचिकाकर्त्याने ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाव्यतिरिक्त ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकाच्या जाहिरात, प्रकाशन आणि विक्रीवरदेखील बंदी घालण्याची मागणी केली होती. चित्रपट आणि पुस्तकात ज्या महिलेने त्याला दत्तक घेतले त्या महिलेचे वर्णन प्रथम वेश्या आणि नंतर कुंटणखाना चालवणारी माफिया गुंड असे करण्यात आले आहे. ही केवळ बदनामीच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही ढवळाढवळ आहे असे म्हणत यापूर्वी याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हायकोर्टाने याचिकाकर्त्याला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि अखेर यावर बुधवार- गुरुवार झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी चित्रपट निर्मात्याला दिलासा दिला. यानंतर आज गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट रिलीज झाला आहे.
Discussion about this post