हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विनोदी विश्वातील कॉमेडी क्वीन म्हणून ओळख असलेली भारती सिंग नुसती हसली तरीही हसायला येत. अशा या कॉमेडी क्विंनला कधीतरी तीच हसवणं इतकं महागात पडेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. भारती आपल्या खतरा खतरा शोमध्ये नेहमीच दाढी-मिश्या लावून लोकांना खळखळून हसवते पण तिचे हे विनोद काहींनी फारसे पटलेले नाही. हे काही म्हणजे शीख समाजाने भारतीच्या या विनोदांवर आक्षेप घेतला आहे आणि अमृतसर येथील शीख संघटनेकडून जोरदार प्रदर्शन देखील केलं गेलं. यानंतर भारतीनं शीख समुदायची माफी मागितली पण याचा काहीही फायदा झाला नाही उलट या प्रकरणाचा भडका उडाला आणि तिच्या विरोधात तक्रार दाखल झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉमेडियन भारती सिंगविरुद्ध आयपीसी कलम २९५-ए अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हि एफआययार एसजीपीसीने नोंदवली आहे. भारतीच्या दाढी- मिशांवरील विनोदामुळे शीख संघटनेच्या भावना दुखावल्या आणि संपूर्ण समाज तिच्यावर नाराज आहे. मोहनी पार्कमध्ये भारती सिंगचं जुनं घर आहे. त्याठिकाणी एसजीपीसीनं स्पष्ट सांगितलं होत कि ते भारतीविरोधात एफआयआर दाखल करणार आहेत आणि त्यांनी हे करून दाखवलं. भारतीने शोमध्ये दाढी आणि मिशांवर विनोद करणे शीख समाजाला पटले नाही. यावरून तिला ट्रोल करीत निदर्शने देखील केली होती. हे प्रकरण वाढल्यानंतर भारतीने शीख समुदायाची हात जोडून माफीही मागितली होती.
त्याच झालं असं कि, भारतीच्या खतरा खतरा या कॉमेडी शोमध्ये जास्मिन भसीन पाहुनी म्हणून आलेली असताना तिच्याशी मजेत बोलताना भरती बोलते कि,”दाढी- मिशा का नकोत. दूध प्यायल्यानंतर दाढी तोंडात टाका म्हणजे शेवया खातोय असं वाटेल. माझ्या कितीतरी मैत्रिणी ज्यांची आता लग्न झाली आहेत त्या सगळ्याच दाढी-मिशांमधील उवा काढण्यात व्यस्त आहेत सध्या”. याच वक्तव्यामूळे हा वाद उफाळला आणि आता भारतीला कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. भारतीने या वादानंतर इंस्टावर व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितली होती. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलेलं की, ”मी कॉमेडी करते लोकांना हसवण्यासाठी,त्यामुळे कुणाला दुःख व्हावं असा माझा कधीच हेतू नसतो. जर माझ्या बोलण्यानं कुणी दुखावलं असेल तर त्यांनी मला बहिण समजून माफ करावं”.
व्हिडिओत ती म्हणतेय कि, ”माझा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे आणि लोकं मला सारखं मेसेज करत विचारत आहेत की तू दाढी-ंमिश्यांची खिल्ली का उडवली आहेस. मी तो व्हिडीओ गेल्या २ दिवसांपासून सारखा पहात आहे आणि तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही देखील तो व्हिडीओ आवर्जुन पहा”. ”मी कोणत्याही विशिष्ट धर्माचा किंवा जातीचा उल्लेख करुन त्या विशिष्ट धर्माचे-जातीचे लोक दाढी-मिश्या ठेवतात आणि मग असे प्रॉब्लेम होतात असं म्हटलं नाही. पंजाबी लोकांसाठी मी नाही म्हटलं की ते दाढी ठेवतात. मी सहज बोलले होते. मी फक्त विनोद करत होती,माझ्या मेत्रिणीसोबत. दाढी-मिश्या तर आजकाल कुणीही ठेवतं. पण जर माझ्या बोलण्यानं कुणा विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून त्यांची माफी मागते. मी स्वतः एक पंजाबी आहे. माझा जन्म अमृतसरचा आहे. मी पंजाबचा सन्मान करते आणि मला अभिमान आहे की मी पंजाबी आहे”.
Discussion about this post