हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सूत्रानुसार डॉक्टरांची बदनामी केल्याप्रकरणी कॉमेडी कलाकार सुनील पाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात रुग्णांची दिवस-रात्र सेवा करणार्या डॉक्टरांची बदनामी करणारे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनील यांच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले जात आहेत अशी माहिती यंत्रणेकडून मिळाली आहे. दरम्यान स्पष्टीकरण देत सुनील पाल यांनी हाथ जोडून डॉक्टरांची माफी मागितली आहे.
Sorry doctor's 🙏🙏🙏🙏 #doctorsaresaviours #AIIMS @AmitShah @AmitShahOffice @PMOIndia @ANI @ndtv @ndtvindia @ABPNews @AIIMSRDA @AMCMUMBAI @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @rajeshtope11 @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra :- https://t.co/X1sE39oEgQ pic.twitter.com/0U72sOIviU
— Sunil Pal Comedian (@iSunilPal) May 5, 2021
अभिनेता सुनील पाल यांनी डॉक्टरांविषयी बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत त्यांच्याकडून डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर टिकात्मक उद्गार काढण्यात आलेले आहेत. या व्हिडिओमध्ये डॉक्टर सैतानाच्या वेशात फिरत आहेत. कोरोनाच्या नावाने डॉक्टरांकडून गरिबांना घाबरविले जात आहे. अश्या संदर्भाचे मत मांडण्यात आले आहे. या अंदर्भात डॉक्टरांच्या संघटनेकडून सुनील पाल यांवर अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sorry all Doctors.. I love you.🙏❤https://t.co/YqTL5OfBeL @aajtak
— Sunil Pal Comedian (@iSunilPal) May 6, 2021
सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येसमोर रुग्णालयातील बेड, औषढे, प्लाझ्मा तर ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अश्यावेळी डॉक्टरांच्या प्रतिमेला धक्का लावणारा हा व्हिडीओ वायरल केल्या प्रकरणी त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांचा वेष सैतानरूपी होता. इतकेच नव्हे तर बेड, औषधे, प्लाझ्मा उपलब्ध नाही, असे सांगून त्यांचे मानसिक शोषण केले जात आहे. गरिब रुग्णांचा सायंकाळपर्यंत मृत्यू होईल. याची पुरेपुरे काळजी घेतली जात आहे असे वक्तव्य या व्हिडिओत केले होते. या प्रकरणी एका डॉक्टरांच्या संघटनेकडून दाखल केलेल्या अर्जानुसार अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्वरित तपासाला सुरुवात केली आहे.
#doctorsaresaviours @AmitShah @AmitShahOffice @ANI @ndtv @ndtvindia @ABPNews https://t.co/rbbkkMp6Tu
— Sunil Pal Comedian (@iSunilPal) May 5, 2021
भारतीय कायदा कलम ५०० अंतर्गत ह्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, इ टाइम्स सोबत बोलताना त्यांनी इमानदार डॉक्टरांसाठी मी हे म्हटलेले नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान त्यांनी हाथ जोडून डॉक्टरांची माफी मागितली आहे. इतकेच नव्हे तर ट्विटरवरून ट्विट करीतसुद्धा त्यांनी कोरोना काळात डॉक्टरांचे मन दुखावल्यामुळे माफी मागितली आहे. सोबत लव्ह यु डॉक्टर्स असे कॅप्शन दिले आहे. लवकरच या प्रकरणाच्या चौकशीसठी पोलीस सुनील पाल याना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
Discussion about this post