मुंबई | प्रकाश झा यांची बहुचर्चित वेब सिरीज आश्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेब सिरीजवर एससी आणि एसटी ॲक्ट अंतर्गत जोधपूर राजस्थान येथील लुणी येथे FIR दाखल केली आहे. एससी आणि एसटी प्रवर्गा सोबत पहिल्या भागामध्ये दाखवलेल्या भेदभावासाठी ही तक्रार नोंदवली आहे.
वेबसिरीजमध्ये पहिल्या सिझनमधील पहिल्या भागामध्ये, काही उच्चवर्गीय जातीतील लोक दलित जातीतील लोकांशी गैरव्यवहार आणि भेदभाव करताना दाखवले गेले आहेत. याविरोधात दलित बांधवांची अस्मिता आणि भावना दुखावल्या गेलेल्या गेल्याचे कारण देऊन राजस्थानातील जोधपूर मधील लूनी या गावी तक्रार दाखल केली असून या FIR नोंदवली आहे. अशी माहिती लुनी पोलिस स्टेशनचे SHO सिताराम पवार यांनी दिली आहे.
प्रकाश झा हे आश्रम वेबसेरिजचे निर्देशक आहेत. आश्रम वेब सिरीज ही साधु महाराज यांचे आश्रमातील गैरप्रकार आणि सामान्य लोकांच्या भावनांना मतांमध्ये परिवर्तन करून राजसत्तेशी कशाप्रकारे हातमिळवणी केली जाते तसेच भक्तीच्या आड गैरवर्तन आणि गुन्हे कसे लपवले जातात याचे चित्रण आश्रम या वेब सीरिजमध्ये दाखवले गेले आहे. या वेब सिरीज मध्ये बॉबी देवल, आदिती पोहनकर, अनुप्रिया गोइंका, दर्शन कुमार, चंदन रॉय सण्याल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Discussion about this post