हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘अलीबाबा : दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवरून अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी रात्री या मालिकेच्या सेटवर आग लागली आणि संपूर्ण सेट जाळून खाक झाल्याचे हे वृत्त आहे. याच मालिकेच्या सेटवर पाच महिन्यांपूर्वी मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेत आपले जीवन संपवले होते. या बातमीने तेव्हा संपूर्ण मनोरंजन विश्वाची झोप उडवली होती. यानंतर आता मालिकेच्या सेटवर लागलेल्या आगीमुळे सेटचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ ही मालिका प्रचंड चर्चेत आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा मालिकेबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ज्या सेटवर तुनिषाने २४ डिसेंबर २०२२ रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. आता तोच सेट एका भीषण आगीत जाळून खाक झाला आहे. शुक्रवारी १२ मे २०२३ रोजी ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ या मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली होती. हि आग अचानक लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागली त्यावेळी सेटवर कुणीही नव्हते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजत आहे.
‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ या मालिकेचा सेट पालघर जिल्ह्यातील भजनलाल स्टुडिओ येथे आहे. शुक्रवारी, १२ मे २०२३ रोजी रात्री भजनलाल स्टुडिओला अचानक आग लागली होती. या आगीचा जाळ इतका मोठा होता कि तिला आटोक्यात आणणे अत्यंत मुश्किल झाले होते. हि आग आटोक्यात आणण्यासाठी शनिवारी १३ मे २०२३ च्या पहाटेपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर १३ मेच्या सकाळी हि आग पूर्णतः विझवण्यात वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना यश आले. या घटनेचे कारण अद्याप समोर आले नसले तरीही घटना भीषण असल्याने सध्या याचा तपास सुरु आहे. या आगीमुळे संपूर्ण सेटचे नुकसान झाले असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
Discussion about this post