Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘दुर्गा’ चित्रपटाचा फर्स्ट लूक चर्चेत; कधी होणार प्रदर्शित..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 16, 2022
in बातम्या, फोटो गॅलरी, हिंदी चित्रपट
0
SHARES
164
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाने २ वर्ष सगळ्याच इंडस्ट्रीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. यानंतर अखेर आता सगळ्यांना सुगीचे दिवस लागले आहेत. यामुळे सिने इंडस्ट्रीने सुद्धा चांगलाच वेग धरला आहे. गेल्या काही काळापासून अनेक चित्रपट सलग प्रदर्शित झाले आहेत तर काही उत्तम कलाकृती अजूनही रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. यांपैकी एक म्हणजे ‘दुर्गा’. हा चित्रपट महिलांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित असून समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासून चांगलाच चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by MAHAK CHAUDHARY (@mahakchaudhary)

‘दुर्गा’ या चित्रपटाच्या शीर्षकातच चित्रपटाच्या कथानकाचे संपूर्ण सार समाविष्ट आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री महक चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘दुर्गा’ चित्रपटातील तिचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. शिवाय तिचा हा लूक चांगलाच दमदार नेटकरी यास उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत. महकच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या अनेक गाण्यांना तिच्या चाहत्यांनी नेहमीच प्रेम दिले आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटालाही भरभरून प्रेम मिळेल अशी तिला आशा आहे.

येत्या नवरात्रीच्या मुहूर्तावर महक चौधरीचा ‘दुर्गा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तूर्तास या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. दुर्गा या चित्रपटामध्ये अभिनेत्री महक चौधरी हि अत्यंत महत्वाची भूमिका साकारते आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. शिवाय याचे कथानक महिलांवर आधारित असून यात कोणत्याही संघर्षासाठी महिला तत्पर असतात असा संदेश दिला आहे. हा चित्रपट येत्या २६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostMahak ChoudhriViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group