Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रेक्षकांनो.. 2 आणि 3 ऑक्टोबरला काय झालेलं आठवतंय ना..?; ‘दृश्यम 2’चा फर्स्ट लूक रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 29, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Drishyam 2
0
SHARES
162
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २ ऑक्टोबर रोजी विजय साळगावकर आपल्या कुटुंबासोबत पणजीला स्वामी चिन्मयानंद यांच्या सत्संग गेले होते. दरम्यान वाटेत त्यांनी एका हॉटेलमध्ये पावभाजीसुद्धा खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबरला हे कुटुंब घरी परतलं. काही आठवतंय का..? होय होय. तुम्ही बरोबर विचार करताय. आपण दृश्यम या चित्रपटाबाबतच बोलत आहोत. अतिशय लक्षवेधी, रंजक आणि थरार कायम ठेवणारी हि कथा घेऊन आता या सिनेमाचा सीक्वेल येऊ घातला आहे. त्याआधी याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. जो चर्चेत आहे.

2 aur 3 October ko kya hua tha yaad hai na? Vijay Salgaonkar is back with his family.

Recall Teaser Out Tomorrow! #Drishyam2 #Tabu #AkshayeKhanna @shriya1109 #RajatKapoor @ishidutta #MrunalJadhav @AbhishekPathakk pic.twitter.com/RgUxGQZPVo

— Ajay Devgn (@ajaydevgn) September 28, 2022

अत्यंत गाजलेला ‘दृश्यम’ हा चित्रपट आजही लोकांच्या लक्षात आहे. यामधील २ आणि ३ ऑक्टोबरची कहाणी तर प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. याच गोष्टीची आठवण करून देत आता अभिनेता अजय देवगण याने ‘दृश्यम २’ चे पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. तर या चित्रपटाचा थरारक टीझर उद्या म्हणजेच शुक्रवारी ३० सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण याने चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, ‘२ आणि ३ ऑक्टोबरला काय झालेलं लक्षात आहे नं..? विजय साळगावकर पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासोबत तुम्हाला भेटायला येत आहे.’

 

या फर्स्ट लूकमध्ये अजय देवगण आणि चित्रपटातील मुख्य पात्र असणारे त्याचे कुटुंब दिसत आहे. त्याच्या २ मुली आणि बायकोच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री श्रिया शरन. मेकर्सने अद्याप कोणाचाही चेहरा समोर आणलेला नाही. मात्र दृश्यम मधील सर्व पात्र पुन्हा पाहायला मिळतील असा अंदाज आहे. यावेळी पहिल्या गोष्टीत ज्या- ज्या हत्यारांचा समावेश आहे ती हत्यारे विजयच्या हातात घेतलेला हा लूक शेअर करण्यात आला आहे. यामुळे पहिल्या चित्रपटाची आठवण येते. या सिनेमातदेखील तब्बू मुख्य भूमिका साकारणार आहे.

Tags: ajay devganDrishyam 2first lookPoster Launchedtabbutweeterviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group