हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो, बालभारती हा शब्द तुमच्या आमच्या आणि आपल्या सगळ्यांसाठीच किती ओळखीचा तितकाच जवळचा आहे. नाही का..? लहानपणी शाळेतील मराठीचे पुस्तक बालभारती नावाने असायचे. त्यामुळे हा शब्द आपल्याला आपसूकच बालपणात घेऊन जातो. म्हणून पुढच्या पिढीच्या बालपणाला जपणारी एक गमतीशीर कथा आणि सोबत मनाला भिडणारा संदेश घेऊन ‘बालभारती’ हा नवा चित्रपट येत आहे. याचे दिग्दर्शन नितीन नंदन यांचे आहे. तर निर्मिती स्फियरओरिजीन्सची आहे. आज बालभारतीचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टारसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘चाईनस्टाईनच्या डोक्यात फिरतात यंत्र भारी..पण इंग्लिश – मराठी मध्ये झुलतेय स्वारी..! ‘बालभारती’ ११ नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!’ या पोस्टरमध्ये चित्रपटाचा मुख्य नायक बालकलाकार आर्यन मेंघजी दिसतो आहे. त्याच्यासोबत सिध्दार्थ जाधव, अभिजित खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकारदेखील दिसत आहेत. मुख्य आकर्षण म्हणजे, आर्यन एक महान शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या पोशाखात दिसतोय. तर आर्यनच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थच्या हातात इंग्रजीतून मराठी शब्दकोश दिसतोय आणि नंदिताने हेल्मेट घातलंय. ज्यावर टॉक इन इंग्लिश लिहिलंय.
या पोस्टरची पहिली झलकच या चित्रपटाचे मुख्य आणि विशेष असे वेगळेपण दर्शवते. त्यामुळे प्रेक्षकांनी देखजील चित्रपटाच्या पोस्टरला भरपूर प्रेम दिल आहे. चित्रपटाचे पोस्टर चित्रपटातील विषयाचा आशय काय आहे याचे संकेत देत असल्यामुळे हा चित्रपट लहान मुलांनी आणि पालकांनी पाहण्याजोगा आहे यात काहीच संशय नाही. ‘बालभारती’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. पालकांना त्यांच्या मुलांसाठी योग्य आणि उत्तम शिक्षण हवे असते. यासाठी पालकांची असणारी तळमळ यातून व्यक्त केली आहे.
Discussion about this post