हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या लोकप्रिय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आलेला कॉमिक अभिनेता म्हणून ओंकार भोजनेचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांनी त्याला कॉमेडी किंग अशी पदवी देखील बहाल केली आहे. अशातच काही महिन्यांपूर्वी ओंकारने हास्यजत्रेला रामराम ठोकला आणि झी मराठीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात तो दिसला. यामुळे त्याचे चाहहते नाराज झाले आहेत. यानंतर आता ओंकारचा असं एक लूक समोर आला आहे जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
छोट्या पडद्यावर कॉमिक भूमिका करत बॉईज चित्रपटाच्या सिरींजमधून वेगळीच भूमिका साकारत लोकप्रिय ठरलेला ओंक्या आता आणखी एका मराठी चित्रपटाच्या माध्यामातून हटके भूमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. ‘सरला एक कोटी’ असे या चित्रपटाचे नाव आहे आणि या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच समोर आले आहे. या पोस्टरमधील ओंकार भोजनेच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष अगदी सहज वेधून घेतले आहे. या पोस्टरमध्ये ओंकार जुगार खेळताना दिसत आहे. त्याचबरोबर समोर दारुची बाटली, दारुने भरलेला ग्लास आणि सिगारेटही दिसते आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘एक्कर गेलं तरी हरकत नाही, पण जोकर जाता कामा नये. चल टाक पत्ते..’
या पोस्टरवर चित्रपटाचे शीर्षक अगदी स्पष्ट दिसत आहे. ज्याखाली सत्य घटनांवरुन प्रेरित असे लिहिण्यात आले आहे. या पोस्टरवर ‘जो नशिबालाही डावावर लावतो तोच खरा गॅम्बलर’ असेही लिहिण्यात आले आहे. नेहमीच कॉमिक भूमिकेतून आपल्या भेटीस आलेल्या ओंकारचा हा लूक पाहून त्याची भूमिका नेमकी काय आहे..? याबाबत एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण निर्मित ‘सरला एक कोटी’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. तर कार्यकारी निर्माते विनोद नाईक आहेत. हा चित्रपट येत्या २० जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post