हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तारक मेहता का उल्टा चष्मा हि बहुचर्चित मालिका सब टीव्ही वर प्रसारित होते. हि मालिका गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेला मंदार चांदवडकर आणि मयुर वाकानी यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता या टीममधील आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यातील काही तंत्रज्ञ तर काही कलाकार आहेत.
शासनाने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार नुकत्याच या मालिकेच्या सेटवरील ११० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या होत्या. ज्यापैकी चार जणांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, असित कुमार यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, या चार जणांपैकी काही कलाकार आहेत तर काही तंत्रज्ञ आहेत. पण इतर सर्वांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आम्ही शूटिंग करतेवेळी सर्व काळजी घेत असतो. जर कोणी थोडं जरी आजारी असेल तर त्या व्यक्तीला आम्ही शूटिंगसाठी बोलवत नाही. या मालिकेत गोलीच्या भूमिकेत असलेल्या कुश शहाला कोरोनाची लागण झाली आहे. तर इतर तीन जण तंत्रज्ञ आहेत. हे सगळे सध्या होम क्वारंटाईन आहेत.
या मालिकेच्या पुढील शुटिंगविषयी सांगताना असित कुमार म्हणाले, शूटिंग अचानक बंद होईल याची कल्पना आम्हाला नव्हती. पण सरकारला परिस्थितीची जाणीव असल्याने त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असेल. सध्या तरी बाहेर जाऊन चित्रीकरण करण्याविषयी आम्ही काही विचार केलेला नाही. पण बायो बबलच्या सहाय्याने आम्ही शूटिंग करण्याचा विचार करत आहोत.
Discussion about this post