हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने अनेक हरहुन्नरी कलाकार सिनेसृष्टीला दिले आहेत. एका पेक्षा एक असे हे कलाकार विविध पात्र साकारतात आणि इरसाल नमुने सादर करत असतात. यांपैकी एक म्हणजे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे. असं एकही स्किट नाही ज्यामध्ये गौरवचा अपमान झालेला नाही. पण त्याची हीच विनोद शैली त्याला प्रेक्षकांचा लाडका बनवते आणि सतत अपमानित होणाऱ्या गौरवला विविध स्तरावर सन्मानित करते. नुकताच त्याला बहुमानाचा राज्यस्तरीय पुरस्कार देखील जाहीर झाला आहे आणि याबाबत त्याने स्वतःच माहिती दिली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या भव्य मंचावर प्रत्येक स्किटमध्ये अपमानित होऊन प्रेक्षकांना खळखळून हसवणारा गौरव मोरे हा अत्यंत दर्जा कलाकार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून त्याने साकारलेलं प्रत्येक पात्र लोकप्रिय ठरलं आहे. त्याच्या या हसवण्याच्या वृत्तीला गौरवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा यंदाचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार त्याला जाहीर झाला आहे आणि याबाबत गौरवने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अभिनेता गौरव मोरेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानुसार, ‘छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा दिनांक १४ मे २०२३ रोजी किल्ले पुरंदर येथे प्रसिद्ध अभिनेता आणि हास्यजत्रा फेम गौरव मोरेला यावर्षीचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार २०२० जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन!!’. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये गौरवने ‘जय शिवराय.. जय शंभुराजे’ म्हणत हा पुरस्कार आपल्याला दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत’. त्याच्या या पोस्टवर कलाविश्वातील कलाकार आणि नेटकऱ्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Discussion about this post