हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेली आणि वादात सापडणारी मॉडेल पूनम पांडे (Model Poonam Pandey) हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. गोव्यात शूट केलेला तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी विरोधी पक्षाने सरकारवर टीकेची झोड उठल्यानंतर आज गोवा पोलिसांनी पूनम पांडेला अटक केली आहे.
पूनम पांडेचा हा वादग्रस्त व्हिडीओ गोवा सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर शूट करण्यात आला. या व्हिडीओवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सध्या कोरोनाच्या काळात धरणावर जाण्यासाठी सामान्य माणसाला बंदी असताना अशा प्रकारच्या शूटिंगला कशी परवानगी दिली जाते, असा आक्षेप घेण्यात आला.
पूनम पांडेला उत्तर गोवा पोलिसांनी सिकरी येथील पंचतारांकित हॉटेलमधून अटक केली आहे. पोलिसांनी IPC 292 नुसार कारवाई केली आहे. पुढील तपासासाठी काणकोण येथे नेण्यात आलं आहे.
दरम्यान शूटिंगची परवानगी देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री प्रमोद सावंत असल्यानं त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली. या शिवाय या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही या पक्षाने आणि सामाजिक संस्थांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’