हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांनी लोककलेचा वारसा असा जपला आणि मोठा केला कि आज महाराष्ट्राची ओळख या कलेने होते. त्यामुळे हे नाव अनंत काळापर्यंत गाजेल यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे उभ्या पिढीने अनुभवण्यासाठी त्यांचा नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक केदार शिंदे आज त्यांचा वारसा पुढे चालवीत आहे. शाहिरांच्या गाण्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण जग गाजवले आहे. त्यांचे महाराष्ट्र गीत आजही नसानसांत शिरशिरी आणते. तर खंडोबाचा जागर मनामनांत भक्ती जागवते. याशिवाय त्यांच्या कोळी गीतांनी सर्वांनाच थिरकायला लावले आहे. अशा महाराष्ट्राच्या लाडक्या शाहीर साबळे यांच्यावर चित्रपट येतोय आणि यामध्ये त्यांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे. यानंतर सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. ती म्हणजे केदार शिंदेनी कास्टिंग कॉल दिला आहे आणि तो हि महाराष्ट्राच्या मातीतील कलाकारांसाठी.
होय. अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील विविध भूमिकांसाठी पात्र निवडणे आहे याची माहिती देत तरुण आणि महाराष्ट्रातील मातीशी संबंधित लोकांसाठी हि सुवर्ण संधी आणली आहे. कास्टिंग डायरेक्टर नम्रता कदम यांच्या मार्फत चित्रपटातील पात्रासाठी योग्य कलाकार निवडले जातील असेही यात सांगितले आहे. यासाठी
वयोगट ६ ते ८ वर्ष (मुलं/मुली)
१२ ते १४ वर्ष (मुलं/मुली)
२२ ते ६० वर्ष (मुलं/मुली)
चित्रीकरण वाई, सातारा, भोर, पुणे, मुंबई या ठिकाणी होणार असून स्थानिक कलाकारांना प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी.
सध्याचे २ फोटो, नाव, वय, उंची, संपर्क क्रमांक, राहण्याचे ठिकाण आणि माहिती तसेच १ मिनिटाचा नवीन ऑडिशन व्हिडीओ करून खालील मेलवर पाठवा. [email protected] ऑडिशनसाठी निवड होणाऱ्या कलाकारांना आम्ही संपर्क साधू असेही यात म्हटले आहे.
वरील माहिती वाचून त्यानुसार आपला ऑडिशन व्हिडीओ पाठवा. निवड झाल्यास प्रोडक्शनमधून फोन येईल आणि तुमची विशिष्ट पात्रासाठी निवड केली जाईल. हि एक सुवर्ण संधी केदार शिंदे यांच्यातर्फे नव्या आणि होतकरू कलाकारांसाठी देण्यात आली असून याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
Discussion about this post