Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शुभ शकुन; कंगनाला ODOP’ची ब्रँड अँबेसेडर घोषित केल्यानंतर योगी आदित्यनाथांनी दिले अयोध्येत येण्याचे आमंत्रण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 2, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्याने कायम चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी कंगना रनौतने योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Famous Actress Kangana Ranawat met @myogiadityanath Hon’ble Chief Minister UP, who presented her with an @UP_ODOP product. Kangna ji will be our Brand Ambassador for ODOP @CMOfficeUP pic.twitter.com/XUJTiStRqv

— Navneet Sehgal (@navneetsehgal3) October 1, 2021

प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ यांचे राज्य असेच सुरू राहो, साम्राज्य वाढो, अशा शब्दांत तिने योगींना शुभेच्छा दिल्या. MSME विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नवनीत सेहगल यांनी माहिती दिली की कंगना उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या ODOP (एक जिल्हा एक उत्पादन) योजनेची ब्रँड अँबेसेडर असेल. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कंगनाला ओडीओपी उत्पादनांचे किटदेखील भेट म्हणून दिले.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

अभिनेत्री कंगना रनौत मुरादाबादमध्ये तेजस चित्रपटाचे शूटिंग संपवून थेट लखनऊ येथे पोहोचली. दरम्यान तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करून योगी आदित्यनाथ यांना भेटणार असल्याची माहिती दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

याविषयी मुख्यमंत्री कार्यालयाने हि एक सौजन्यपूर्ण भेट असल्याचं सांगितलं. परंतु यानंतर त्यांनी कंगनाला ओडीओपी योजनेची ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केलं. या बैठकीदरम्यान कंगनाने योगी आदित्यनाथ यांच्या यूपीतील कार्याची भरभरून प्रशंसा केली आहे. याशिवाय योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला अयोध्येत येण्याचेही आमंत्रण दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

या भेटीविषयी बोलताना अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट खूप छान झाली. ते सरळमार्गी आणि खरे आहेत. योगीजी नेहमीच प्रेरणा देतात. इतक्या कमी वयात देशाला लाडका नेता मिळणे हे भाग्यच आहे, प्रभू श्रीरामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहो आणि योगीजींचे साम्राज्य वाढो हीच सदिच्छा, असे म्हणत कंगनाने योगीजींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी कंगनाला एक विशेष वस्तू भेट म्हणून दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी वापरण्यात आलेलं नाणं त्यांनी कंगनाला भेट केले आहे. कंगनाने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तसेच, हा शुभशकुन असल्याचं कंगना म्हणाली आहे.

Tags: Bollywood ActressBrand AmbassadorInstagram PostKangna RanautOne District One ProductUP CMYogi Adityanat
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group