हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कुणाचे अचानक आयुष्यातून निघून जाणे मन विचलित करते. असेच काहीसे काळ मनोरंजन क्षेत्रात घडले. बिग बॉस १३ चा विजेता आणि टीव्ही मालिका विश्वात आपली अलग छाप सोडलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने काल आपल्या कुटुंबियांसह आपल्या चाहत्यांना अलविदा म्हटले.
त्याची अकाली एक्झिट निश्चितच धक्कादायक होती. मात्र जाने वाले को कौन रोकता है? अश्या परिस्थिती आपल्या प्रियजनांना सोडून सिद्धार्थ कायमचा निरोप घेऊन गेला. सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने काल (गुरुवारी) निधन झाले आहे. यानंतर आज काही वेळापूर्वी त्याच्या पार्थिवावर ओशिवरा वैकुंठभूमीत अंत्य संस्कार पार पडले आहेत. यावेळी त्याचे कुटुंबीय, मित्र मैत्रिणी, मनोरंजन विश्वातील सहकलाकार आणि अनेको चाहते उपस्थित होते.
काल सकाळी रात्री झोपलेला सिद्धार्थ उठलाच नाही म्हणून त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले. यांनतर डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. पुढे त्याच्या पार्थिवावर कूपर रुग्णालयातच शवविच्छेदन करण्यात आले आणि याचा अहवाल पोलिसांना देण्यात आला.
मुंबई पोलिसांकडून सिद्धार्थ शुक्लाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचे सांगण्यात आले. परंतु बायोप्सीनंतर मृत्यूचे मूळ कारण सांगण्यात येईल असेही सांगितले. कारण सिद्धार्थच्या शवविच्छेदन अहवालवरुन डॉक्टरांमध्ये मतभेद असून कुठलाच अंतिम निष्कर्ष काढला गेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोस्टमार्टम नंतर सिद्धार्थचे पथिक त्याच्या घरी अर्थात ओशिवरा येथे नेण्यात आले. त्याच्या अंत्य दर्शनासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली होती. साश्रू नयनांनी भरलेले डोळे आणि टाहो फोडणारे सिद्धार्थचे चाहते त्याला अखेरचे पाहण्यासाठी धडपडताना दिसले. सिद्धार्थची आई त्याच्या निधनानंतर अत्यंत कोलमडली असून हा धक्का त्यांच्यासाठी असहनीय आहे.
तर सिद्धार्थची लाडकी मैत्रीण शेहनाज गिल अखेर सिद्धार्थला निरोप देण्यासाठी वैकुंठभुमीत पोहचल्याचे दिसली. तिची अवस्था अत्यंत वाईट असून तिला पाहिल्यानंतर सिद्धार्थचे चाहते आणखीच गळून गेले.
बिग बॉस १३ मध्ये सिद्धार्थ आणि शेहनाजची गट्टी जमल्यानंतर ते शो नंतरही एकत्र दिसले होते. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच हिट होती. पण सिद्धार्थची एक्सिट शेहनाझला एकाकी करून गेली इतकं नक्की.
सिद्धार्थ शुक्लाचा जन्म १२ डिसेंबर १९८० साली मुंबईत झाला. यानंतर त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. पुढे २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने ‘बाबुल का आंगन छूटे’ या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. तर दिल से दिल तक या मालिकेमुळे तो चांगलाच प्रकाशझोतात आला. यानंतर बिग बॉस १३ या रिऍलिटी शोमधून त्याने चाहत्यांना जणू वेड लावले. त्यामुळे सिद्धार्थचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अश्या हरहुन्नरी आणि कायम लक्षात राहणाऱ्या सिद्धार्थला अखेर… अलविदा. RIP
Discussion about this post