Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हिंदुस्थानी भाऊमूळे सरकार अडचणीत..?; राजकारणात उसळल्या विविध प्रतिक्रिया

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hindustani Bhau
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन। सोमवारी १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचा सागर असा काही लोटला होता कि यामध्ये सरकार बुडत का काय? अशी भीती वाटू लागली होती. विद्यार्थ्यांची आक्रमकता पाहून एकीकडे सरकारी अधिकर्यांनादेखील चांगलाच घाम फुटला होता. या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपाखाली बिग बॉस फेम हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव आहे असे ते म्हणाले आहेत.

https://www.instagram.com/tv/CZYw9CYFbV0/?utm_source=ig_web_copy_link

यावेळी सचिन सावंत यांनी आपले मत मांडताना म्हटले कि, हिंदूस्तानी भाऊ याला सोशल मीडियावर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपा/संघाच्या संबंधित लोकांची होती. अनेकवेळा हा व्यक्ती द्वेषपूर्ण व शिवीगाळयुक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते. तो हल्ली ज्या पध्दतीने मुलांना भडकवण्याचे काम करत आहे व पध्दतशीरपणे आंदोलनं केली जात आहेत त्यामागे मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव दिसतो. या सर्व प्रकाराची खोल चौकशी मविआ सरकारने करावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.

हल्ली ज्या पध्दतीने मुलांना भडकवण्याचे काम करत आहे व पध्दतशीरपणे आंदोलनं केली जात आहेत त्यामागे मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव दिसतो. या सर्व प्रकाराची खोल चौकशी मविआ सरकारने करावी.

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 1, 2022

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, कोण कुठला भाऊ,त्याच्या सांगण्यावरून एवढी मुलं जमा होतात आणि कुठल्याच विदयार्थी संघटनांना पत्ता नसतो.हे सर्वच विद्यार्थी संघटनांनी गंभीर्यानी घ्यायला हवं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संघटना गंभीर नाहीत त्यामुळे कुठल्यातरी वैचारिक बैठक नसलेल्या माणसाच्या पाठी विद्यार्थी जात आहेत.

कोण कुठला भाऊ,त्याच्या सांगण्यावरून एवढी मुलं जमा होतात आणि कुठल्याच विदयार्थी संघटनांना पत्ता नसतो.हे सर्वच विद्यार्थी संघटनांनी गंभीर्यानी घ्यायला हवं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संघटना गंभीर नाहीत त्यामुळे कुठल्यातरी वैचारिक बैठक नसलेल्या माणसाच्या पाठी विद्यार्थी जात आहेत.

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 31, 2022

हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक हा एक युट्युबर आहे. आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय हिंदी बिग बॉसच्या १३ व्या सिजनमध्ये हिंदुस्थानी भाऊ झळकला होता. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. मात्र यावेळी त्याने केलेल्या वक्तव्यामुळे विद्यार्थी मनांवर गंभीर परिणाम झाल्यामुळे मुलांमधील आक्रमकता वाढली. परिणामी विद्यार्थी आंदोलनाचा असा काही उद्रेक झाला कि सरकारला घाम फुटला. परिक्षेच्या काळात शिव्या देणार्‍या भाऊपासुन मुलांना लांब ठेवले पाहिजे, ही दक्षता पालकांनी घ्यायला हवी. 18 वर्षाच्या आतील मुलांना भडकावणे चुकीचे आहे. पालकांनी भाऊच्या विरोधात उभे रहायला हवे. अश्या पद्धतीच्या प्रतिक्रिया अनेक लोकांनी दिल्या आहेत. एकंदरच यावेळी हिंदुस्थानी भाऊंचे चाहतेदेखील त्याच्या कृतीवर नाराज आहेत.

Tags: Congress Leaderhindustani bhauMNS LeaderSachin SawantSandeep DeshpandeStudents MovementViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group