हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने फार कमी वेळात स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अतुलनीय अभिनय आणि दर्जेदार व्यक्तिमत्व असा विकी लवकरच आगामी शहीद उधम सिंग या चित्रपट भारी भक्कम पात्र साकारताना दिसणार आहे. विकी कौशलने एका मुलाखतीत सांगितले होते कि, हा चित्रपट त्याच्यासाठी एखाद्या ड्रीम प्रोजेक्टसारखाच आहे. यानंतर आता ‘सरदार उधम सिंह’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता विकी कौशल ‘सरदार उधम सिंह’ या चित्रपटात दिसणार म्हटल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये एक विशेष उत्सुकता होती ती त्याच्या लुकबद्दल. अखेर उत्सुकतेला मार्ग मिळाला आणि प्रतिक्षा संपली. विकीने स्वतःच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांसाठी सरदार उधम सिंगचा टीझर शेअर केला आहे. यामध्ये विकी कौशलची झलक पाहायला मिळत आहे. शिवाय या टीझरमध्ये दर्जा पार्श्वसंगीत ऐकायला येत आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवलेली एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे, सरदार उधम सिंह यांचा पासपोर्ट तयार केला जात आहे. चाहत्यांनी अद्याप अभिनेत्याचा लूक पूर्णपणे पाहिलेला नाही. पण टीझर शेअर करताना विकी कौशलने यासोबत लिहिले कि, शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त मला त्यांचे सहकारी – सरदार उधम सिंह यांच्या एका मिशनची कथा आणताना अभिमान वाटतो. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्याच्या चाहत्यांमध्ये वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा टिझर इतका सुपर आहे कि अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसेच चाहत्यांना हा टीझर प्रचंड पसंतीस उतरत आहे. हा टीझर पाहून चाहत्यांनी त्यावर एकापेक्षा एक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CUKy3e7Nwvv/?utm_source=ig_web_copy_link
माहितीनुसार, निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हा चित्रपट चित्रपटगृहांऐवजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. इतकेच नव्हे तर, असे म्हटले जात आहे की निर्मात्यांनी एकत्र ठरवले आहे हा चित्रपट सरदार उधम सिंह दसऱ्याच्या वीकेंडमध्ये थिएटरऐवजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर केला जाईल. सध्या, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १६ ऑक्टोबर २०२१ असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय या चित्रपटात विकी कौशल स्वातंत्र्य सेनानी सरदार उधम सिंह यांचे शौर्य सादर करताना दिसणार आहे. यामुळे चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. सरदार उधम सिंग यांनी १९४० मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचे औचित्य साधून लंडनमध्ये मायकेल ओ’डायर (पंजाबचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर) यांना गोळ्या घातल्या. अश्याच शौर्यगाथेचे संपूर्ण कथानक या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Discussion about this post