हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड मधील २०१९ साली प्रदर्शित झालेला गली बॉय हा चित्रपट आपल्याला ठाऊकच असेल. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट दिसले होते. या चित्रपटातील गाण्यांना संगीत देणारा रॅपर धर्मेश परमार म्हणजेच MC तोडफोड याचे निधन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वयाच्या अवघ्या २४’व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. त्याची MC तोडफोड या नावाने एक वेगळीच ओळख होती. मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या मृत्यूचे कारण कार अपघात आहे. सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहणारा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
रॅपर धर्मेश हा मूळचा मुंबईचा होता. तो स्ट्रीट रॅपर्स या ग्रुपचा एक महत्वाचा भाग होता. तो गुजराती रॅपसाठी चांगलाच प्रसिद्ध होता. मात्र त्याची सर्वाना ओळख झाली ती रणवीर सिंगच्या गली बॉय या चित्रपटाचा साउंडट्रॅक तयार केल्यानंतर. त्याने या ट्रॅकला आपला आवाज दिला होता. स्वदेशी नावाच्या सिंगिंग बँडसोबत तो कार्यरत असून याच बँडने धर्मेशच्या निधनाची बातमी दिली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, धर्मेशच्या कारचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
स्वदेशी बँडने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत धर्मेशच्या निधनाची माहिती दिली आहे. शिवाय आपल्या खास शैलीत त्यांनी धर्मेशला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी अलीकडेच झालेल्या ‘स्वदेशी बॅन्डच्या परफॉर्मन्सचा एक व्हीडिओ शेअर करीत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबईतील बीडीडी चाळीत वाढलेला धर्मेश परमार हा मुंबईतील प्रसिद्ध रॅपर झाला आणि आज तो रॅप गाण्यांमधला एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याची गाणी तरूण प्रेक्षकांसाठी पर्वणी आहेत. त्याच्या निधनामुळे सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून त्याचे चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.
Discussion about this post