हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गानसम्राज्ञी’ हे इतकेच पुरेसे आहे एक अश्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्यासाठी ज्यांचे नाव साता समुद्रापारही लोक सहज ओळखतात. हे नाव आहे लता मंगेशकर. एक अत्यंत प्रभावशाली आणि तानबद्ध सुरंजी जण असणाऱ्या ज्यांच्या आवाजाने कुणीही मंत्रमुग्ध होईल अश्या लता दीदी प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमान आहेत. संगीताच्या जगात त्यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते कारण, खरोखरच त्यांच्यासारखे अन्य कुणीही होणे नाही. ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या लता दीदींचा आवाज जणू दैवी देणगी आहे. आज लता दीदींचा ९२ वा वाढदिवस आहे आणि असेच अनेको वाढदिवस साजरे करण्याची संधी आपल्याला मिळो. कारण लता दीदी म्हणजे सप्तसुरांचे एक स्थान आणि संगीताच्या दुनियेला मिळाले एक वरदान आहे.
तसे पाहता मंगेशकर हे घराणे संगीत लहरींनी बहरलेले आहे हे आपण जातोच. प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले, संगीतकार पंडित हृदयनाथजी मंगेशकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर हि तिन्ही भावंडे आहेत आणि या तिघांनीही संगीताच्या दुनियेत आपले वेगलेसे स्थान निर्माण केले आहे. यांपैकी लता दीदींचा आज ९२ वा वाढदिवस आहे. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली झाला. याच दिवशी संगीत जगताला एक आशीर्वाद प्राप्त झाला असे म्हणायला हरकत नाही. कारण दीदींनी गायला सुरुवात केली, जेव्हा तंत्रज्ञान फारसे प्रगत नव्हते. जसे कि, म्युझिक रेकॉर्डिंग, सॉंग मिक्सिंग यासाठी लागणारी उपकरणे प्रगत नव्हती. मात्र लता दीदींचा आवाजच जगावर राज करायला पुरेसा होता.
‘महल’ मधील ‘आयेगा आने वाला’ या गाण्याने दीदींना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. हे गाणे ज्या पद्धतीने रेकॉर्ड केले गेले यासाठी दीदींनी खूप मेहनत घेतली होती. याबाबत बोलताना दीदी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या कि, मायक्रोफोन खोलीच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता आणि त्या खोलीच्या एका कोपऱ्यात उभ्या होत्या. ‘खामोश है जमाना’ या पहिल्या ओळी गाताना मी माईकच्या दिशेने पुढे जात होते आणि जेव्हा माईकच्या समोर पोहचायचे तेव्हा ‘आयेगा आने वाला’ सुरू करायचे. हे अवघड होते. पण हे गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर हायसे वाटले.
मित्रांनो, १९४८-४९ या वर्षात दीदींनी इतकी मेहनत केली कि एका दिवसभरात त्या साधारण किमान ८ गाणी तरी रेकॉर्ड करायच्या. सकाळी २ गाणी, दुपारी २ गाणी, संध्याकाळी २ गाणी आणि रात्री २ गाणी अश्या क्रमात त्या रेकॉर्डिंग करत असे. अहो इतकेच नव्हे तर अनेकदा त्या उपाशीपोटी सुद्धा अख्खा दिवसभर गाणे गायच्या. कधीकधी गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर रेकॉर्डिंग नीट झाले नाही म्हणून पुन्हा त्यांना बोलावले जायचे. पण त्या थकत नव्हत्या का थांबत नव्हत्या. एक जिद्द होती आणि मेहनत करायची पूर्ण तयारी होती. याच गुणांमुळे कधीकाळी फक्त लता मंगेशकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीदी आज भारताचा अभिमान, गानसम्राज्ञी आणि भारतरत्न म्हणून ओळखल्या जातात.
Discussion about this post