हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बालगंधर्व, लोकमान्य टिळक अशा अत्यंत आव्हानात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मानत कायमचे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता सुबोध भावे यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आहे. हि बातमी ऐकताच सुबोधने चाहते नक्कीच खुश होतील. यात काहीच वाद नाही. आव्हानात्मक भूमिका अगदी सहज साकारणारा सुबोध भावे आता लवकरच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘हर हर महादेव’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटात सुबोध छत्रपतींची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले असून चांगलेच चर्चेत आहे.
अभिनेता सुबोध भावेने आपल्या आगामी ऐतिहासिक चित्रपटाचे पोस्टर शेअर करत एक तडफदार कॅप्शन देखील दिलेले आहे. या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे कि,
अखंड स्वराज्याचं स्वप्न पाहणारा तो राजा रयतेचा,
मराठी रक्तासाठी लढणारा तो लेक जिजाऊचा,
गनिमाच्या चिंध्या करणारा तो चालक भवानी तलवारीचा,
एकमेव जो छत्रपती झाला तो भक्त जगदंबेचा…
आता अभिमानाने मोठ्या पडदयावर ‘हर हर महादेव’ ही शिवगर्जना घुमणार ,पहिल्यांदाच मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून, येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार.
झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स निर्मित ‘हर हर महादेव’ या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे शिवरायांच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नुसता आनंदी आनंद आहे. या चित्रपटातील अन्य भूमिकांबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र हा एक दर्जेदार ऐतिहासिक कलाकृती आहे हे काही वेगळे सांगायला नको. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी केले आहे. मुख्य बाब सांगायची म्हणजे हा चित्रपट एक दोन नव्हे तर तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हर हर महादेव चित्रपटाबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले की, ‘यंदाची दिवाळी ही ‘झी स्टुडिओज’च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरावी अशी मनात इच्छा होती. हर हर महादेव या चित्रपटाच्या माध्यमातून ही पर्वणी आम्ही घेऊन येणार आहोत. छत्रपतींच्या कार्याचा त्यांच्या कर्तृत्वाचा महिमा हा केवळ राज्य आणि देशच नव्हे तर सातासमुद्रापार पोहोचलेला आहे. आभाळाएवढं कर्तृत्त्व असलेल्या आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांची गोष्ट सादर होताना ती त्याच भव्यतेच्या तोलामोलाची असावी असा विचार कायम मनात होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचं कार्य अशाच भव्य दिव्य स्वरुपात आपण आणणार आहोत याचा विशेष आनंद आहे.’
Discussion about this post