हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादा आणि पाठक बाई या भूमिकांमधून अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशीने प्रेक्षकांचे मन जिंकले. हि मालिका संपली पण प्रेक्षकांचे प्रेम मात्र त्यांच्यावर आजही तितकेच आहे. अनेकांनी या मालिकेनंतर अक्षया आणि हार्दिकचं लग्न व्हावं म्हणून इच्छा व्यक्त केली होती. यानंतर हार्दिक आणि अक्षया एकमेकांना डेट करू लागले आणि अखेर हि दोघ लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची केवळ चर्चा आहे. पण आता व्हायरल पोस्टमुळे येत्या ३ दिवसांवर त्यांचे लग्न असल्याचे समजत आहे. याशिवाय अक्षयाच्या ग्रहमख विधीचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक आणि अक्षया येत्या १ डिसेंबर २०२२ रोजी एकमेकांचा हात साताजन्मासाठी धरणार आहेत. दोघांच्या लग्नाचे ठिकाणी, तारीख, वेळ याबाबत विशेष गोपनीयता राखली आहे. मात्र सुत्रानुसार, अक्षया आणि हार्दिक त्यांची लग्न गाठ मुंबई- कोल्हापूर नव्हे तर पुण्यात बांधणार आहेत. इतकेच नव्हे तर चर्चेनुसार, दोघांचं लग्न पुण्याच्या पारंपरिक सुंदर ढेपे वाड्यात होणार आहे. आता केवळ दोघांकडून लग्नाची अधिकृत माहिती येणे बाकी आहे. ती आली कि या जोडप्याला शुभेच्छा द्यायला आपण मोकळे.
सध्या सोशल मीडियावर अक्षयच्या ग्रहमख विधीचे फोटो व्हायरल होत आहेत. अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये अक्षयाच्या ग्रहमख विधीचे फोटो आहेत. यामध्ये अक्षयाचं सजलेलं नवरीचं रुपडं अत्यंत लक्षवेधी आहे. याशिवाय हार्दिकने घरच्या केळवणाचा फोटो शेअर केला आहे. तो देखील चर्चेत आहे.
Discussion about this post