Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राणादा आणि अंजली बाईंचा शाही थाट; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 24, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय झालेली मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’च्या माध्यमातून राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अंजली बाई म्हणजेच अक्षया देवधर हे कलाकार प्रेक्षकांच्या ध्यानी मनी वसले आहेत. खरतर मालिका संपून बराच काळ लोटला आहे पण हार्दिक आणि अक्षयचा क्रेझ अद्याप कायम आहे. मालिकेतील दोघांचाही अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला होता. त्यामुळे राणादा आणि अंजलीबाई ही जोडी रसिक प्रेक्षकांची लाडकी जोडी बनली. यानंतर आता अक्षय आणि हार्दिक दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यामुळे ते नेहमीच आपले फोटो शेअर करताना दिसतात. तर विशेष असे कि, गेल्या काही दिवसांपासून दोघेही निरनिराळ्या अंदाजात फोटोशूट करत चाहत्यांच्या कौतुकाची थाप मिळवीत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

दरम्यान या फोटोशूटपैकी एक फोटोशूट सध्या चांगलेच वायरल होत आहे. या दोघांचाही एक शाही लूकमधला व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात दोघांचाही अलग असा शाही अंदाज पहायला मिळतोय. याआधीही केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियावर दंगा केला होता. यानंतर हे शाही फोटोशूट पाहून तर चाहते अक्षरशः अवाकच झाले आहेत. या व्हिडिओवर सध्या दोघांचेही चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. व्हिडिओतील दोघांचा शाही थाट पाहून चाहत्यांच्या नजरा जणू खिळल्या आहेत. ब्लॅक अँड गोल्डन शेड असलेल्या आकर्षक लेहंग्यामध्ये अक्षयाचे सौंदर्य कित्येक पटीने खुलले आहे. तर हार्दिक जोशीनेही अश्याच रंगसंगतीचा पेहराव केला आहे आणि तो तर अगदी राजा महाराजा वाटतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

ऑफक्रीन असो किंवा ऑनस्क्रीन त्यांचा प्रत्येक अंदाज त्यांच्या चाहत्यांसाठी खास आणि स्पेशल आहे. तसाच यावेळीसुद्धा दोघांच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कधी स्टायलिश तर कधी देसी असे भन्नाट लूक आपल्याच शैलीत प्रसिद्ध करणारे अक्षय आणि हार्दिक सध्या विविध फोटोशूटमध्येच व्यस्त आहेत. या फोटोशूटवर अनेक चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर दोघांचे एकत्र फोटो पाहून दोघांनीही लग्न करावे अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. दोघांचा हा थाट फोटोशूटसाठी आहे. मात्र चाहत्यांनी तर लग्न सोहळ्यासाठीच ते सजले आहेत असा संदर्भ लावायलाही कमी केलेले नाही. पण काही म्हणा राव! दोघेही या पेहरावात खूप सुंदर दिसत आहे. पुन्हा एकदा राणा दा आणि अंजली बाईंची केमिस्ट्री रंगली असे म्हणायला काही हरकत नाही.

Tags: Akshaya DeodharHardik JoshiTuzyat Jeev Rangla fameViral Photoshootzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group