हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. पण वाईट गोष्ट म्हणजे यावेळी ती डान्स व्हिडीओ किंवा रीलमुळे चर्चेत नसून तिच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यामुळे चर्चेत आहे. माहितीनुसार, आज बुधवारी यूपी पोलिसांचे एक पथक सपना चौधरीला अटक करण्यासाठी हरियाणाला रवाना झाले आहे. त्याच झालं असं कि, सपना चौधरीवर आगाऊ पैसे घेऊन कार्यक्रम अचानक रद्द केल्याबद्दल आणि तिकीटधारकांना पैसे परत न दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. लखनऊच्या एसीजेएम कोर्टाने सोमवारी तिच्याविरोधात अटक वॉरंटदेखील जारी केलं. त्यामुळे आज कधीही तिला अटक होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
#सपना_चौधरी का गिरफ्तारी वारंट #SapnaChaudhary #DancerSapnaChoudhary #Lucknow #Court #Dancer #LatestNews #ArrestWarrant #FamousDancer https://t.co/Ngx7bMPG1l
— News Puran (@NewsPuran1) August 24, 2022
वास्तविक, सपना चौधरी सोमवारी कोर्टात सुनावणीसाठी हजर राहणार होती. मात्र ती न्यायालयात हजर राहिलीच नाही. इतकंच नव्हे तर तिच्या वतीनेदेखील कोणता अर्ज करण्यात आला नाही. यावर कडक भूमिका घेत न्यायालयाने सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट काढले.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी पुढील सुनावणीची तारीख ३० सप्टेंबर निश्चित केली आहे. माहितीनुसार, तिच्याविरोधात नोव्हेंबर २०२१ मध्येदेखील या कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं. पण तेव्हा सपना कोर्टात हजरही राहिली आणि तिला जामीनही मिळाला होता. उपनिरीक्षक फिरोज खान यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये आशियाना पोलिस ठाण्यात FIR दाखल केली होती.
हाती आलेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीने २०१८ साली एका कार्यक्रमासाठी आगाऊ पैसे घेतले होते. पण ऐनवेळी कार्यक्रम रद्द करून तिने स्टेजवर परफॉर्म केलं नाही. यामुळे आयोजक आणि उपस्थित हडबडले. ज्यासाठी तिला आयोजकांनी आगाऊ पैसे दिले तो कार्यक्रमच झाला नाही. त्यामुळे आयोजकांनी पैसे परत मागितले. पण सपनाने ते पैसे परत देण्यास नकार दिला. यामुळे आयोजकांनी हे प्रकरण न्यायालयात खेचलं आणि आता सपना चांगलीच गोत्यात आली आहे.
Discussion about this post