हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील आघाडीच्या वाहिन्यांमध्ये झी मराठी सगळ्यात वर आहे. कारण या वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसते. आताही सुरु असलेल्या मालिका लोकप्रिय असून टीआरपीच्या शर्यतीत घोडदौड करत आहेत. मालिकेचे प्रत्येक अपडेट या वाहिनीच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले जातात. पण सध्या झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटची सिस्टीम उलटी पालटी झाली आहे. वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरील सर्व पोस्ट्सची उलटापालट झाल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा नक्की काय प्रकार आहे हे काही कळायला मार्ग नाही.
सध्या झी मराठी वाहिनीवरील विविध मालिका तुफान लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. यामध्ये सातव्या मुलीची सातवी मुलगी, तू चाल पुढं, यशोदा, नवा गडी नवं राज्य, लवंगी मिरची या मालिकांचा समावेश आहे.
विविध आशयाच्या या मालिका प्रेक्षकांचं प्रेम मिळवताना दिसत आहे. त्यामुळे या मालिका घराघरात लोकप्रिय होताना दिसत आहेत. पण वाहिनीचं मुख्य सोशल मीडिया हॅण्डल ज्या प्रकारे उलटं पालटं झालंय ते पाहून प्रेक्षकांना देखील सुचायचे बंद झालं आहे झी मराठीचे सर्व सोशल मीडिया हॅक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
आतापर्यंत झी मराठीचे अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरील सर्व पोस्ट्स उलट्या पालट्या दिसत आहेत. यावरील फोटो, व्हिडिओ आणि अगदी कॅप्शनसुद्धा उलटं झालंय.
आता झी मराठी वाहिनीचे सोशल मीडिया हॅण्डल खरंच हॅक झालंय का हा नवा प्रमोशन फंडा आहे हे अजून काही समजलेलं नाही. पण लवकरच याचा उलघडा होईल यात काही शंका नाही. आतातरी या उलट्या पोस्ट पाहून नेटकरी असाच अंदाज लावत आहेत कि झी मराठी वाहिनीचे सोशल मीडिया हॅण्डल हॅक झाले आहे.
Discussion about this post