हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची अभिनेत्री अनन्या पांडे आणि साउथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. अनन्या आणि विजयचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच सोशल मीडियावर मात्र ‘लायगर’ मोठ्या अडचणीत सापडायचे दिसत आहे. कारण सोशल मीडियावर बॉयकॉट लायगर असा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे आणि याच कारण ठरतंय चित्रपटातील आफत गाणं. होय. चित्रपटातील आफत या गाण्यामुळे नेटकरी लायगर’चा निषेध करत आहेत.
आगामी चित्रपट ‘लायगर’ मधील ‘आफत’ हे गाणं रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. यामध्ये अनन्या आणि विजयची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना आवडते आहे. तर दुसरीकडे या गाण्यामुळे चित्रपटावरच आफत आली आहे असं दिसत आहे. या गाण्याने सध्या मोठा वाद ओढवून घेतला आहे. हे गाणं नीट ऐकले तर तुमच्याही लक्षात येईल कि, गाण्यात मध्येच संवाद ऐकायला येत आहेत. ज्यामध्ये ‘भगवान के लिए छोड दो मुझे, छोड दो, छोड दो मुझे’ असे डायलॉग आहेत. हे डायलॉग अनन्या विजयच्या तावडीतून स्वतःला सोडवण्यासाठी बोलताना दिसते आहे.
आता आपण सारेच जाणतो कि, ‘भगवान के लिए छोड दो मुझे’ हे डायलॉग सर्वसाधारणपणे सिनेमांमध्ये रेप सीन्ससाठी वापरले जातात. पण लायगरच्या ‘आफत’ गाण्यात मात्र हे रेप डायलॉग रॅप म्हणून सामिल केले आहेत आणि यामुळे नेटकरी भडकले आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या गाण्याला जबरदस्त ट्रोल केले आहे. ‘हे गाणं प्रत्येक अॅडल्ट सिनेमात ओपनिंगला असायला हवं’, असं अनेकांनी म्हटलंय. तर या गाण्याच्या शब्दांमूळे आजच्या तरुणाईवर वाईट परिणाम होतील अशा भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
Discussion about this post