हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने प्रेक्षकांचे नेहमीच बहरभरून मनोरंजन केले आहे. यामुळे हा शो संपूर्ण मालिका विश्वात टॉप ५ मध्ये आहे. या शोमधील हास्यवीर एकपेक्षा एक अवली आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळातही प्रेक्षकांना टेन्शन विसरून हसायला लावलं. खरोखरीच हा शो टेन्शनवरची मात्रा झाला. मध्यंतरी या शोच्या हास्यवीरांनी एक ब्रेक घेतला होता. पण आता जोशात ते पुन्हा मनोरंजन करत आहेत. यातच आता जत्रेकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भयानक भेट झाली. तीही विमानात. होय नागपूरकरांचे मनोरंजन करून येत असताना हास्यवीरांची फडणवीस यांच्यासोबत विमानात भेट झाली.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोमधील कलाकार समीर चौगुले, पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे मिळून नागपूरमधील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास नागपूर दौऱ्यावर गेले आहेत. नागपूरकरांची भेट घेऊन त्यांना हसवण्याचा जबाबदारी या कलाकारांनी घेतली आहे. दरम्यान नागपूरला जाताना हे हास्यवीर ज्या विमानाने प्रवास करत होते त्याच विमानाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्रवास करत होते. त्यामुळे योगायोगाने त्यांची भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून या कलाकारांचे कौतुक केले आणि मुख्य म्हणजे या प्रवासादरम्यान ते हास्यजत्रा कार्यक्रमाचे मागील भाग पाहत होते. हे पाहून तर कलाकार मंडळी आणखीच खुश झाली.
या भेटीचा योग्य हा निव्वळ योगायोग असला तरीही हास्यजत्रेच्या कलाकारांसाठी हि फार मोठी बाब होती. आपल्या व्यस्त जीवनशैलीत देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपला शो आवर्जून पाहतात आणि त्यावर दाददेखील देतात. याहून मोठी पोचपावती काय असणार..? या कलाकारांना भेटल्यावर फडणवीस देखील आनंदी झाले होते. त्यांनी कलाकारांचे, कार्यक्रमाचे आणि सोनी मराठी वाहिनीचे भरभरून कौतुक केले. कलाकारांनी देखील आपला आनंद, हर्ष व्यक्त केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील या कलाकारांची नागपूर एअरपोर्टवरील ही भेट अतिशय उत्साही होती.
Discussion about this post