हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस आले. प्रत्येकाने स्वतःची एक वेगळी छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. त्यामुळे हास्यजत्रेचा जितका टीआरपी आहे तितकी प्रचंड लोकप्रियता यातील हास्यवीरांची आहे. अनेक वर्षांपासून आणि अगदी कोव्हिडच्या काळातही हास्यजत्रेने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. यामुळे कलाकार आणि प्रेक्षकांचे एक भावनिक नटे निर्माण झाले आहे. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर प्रेक्षकांचा लक्ष असतो. हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांची शालू फेमस आहे आणि आता आपल्या नव्या ढंगासह ते राजकारणात एंट्री करणार आहेत.
प्रभाकर मोरे यांचं विनोदाचं अचुक टायमिंग त्यांना नेहमीच प्रकाशझोतात आणत असतं. चाहत्यांनी त्यांच्या प्रत्येक पात्रावर भरभरून प्रेम केलं आहे. त्यांची विनोदी शैली आणि अनोखा ढंग त्यांना इतरांहून वेगळेपण देतो. असे हे प्रभाकर मोरे आता सेकंड इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. असं बोललं जात आहे कि, प्रभाकर मोरे आता राजकारणात आपला नवा अवतार घेऊन उतरले आहेत. चर्चेनुसार, त्यांनी एका राजकीय पक्षामध्ये जाहीर प्रवेशही केला असल्याचे बोलले जात आहे.
एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हास्यवीर प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. पण ते कोणत्या पक्षात आणि कधी कधी प्रवेश करणार याबाबत काहीही माहिती मिळाली नव्हती. अशातच आता त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या बातमीने सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे.
Discussion about this post