हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघेही अगदी काहीच महिन्यांपूर्वी लग्नबबंधनात अडकले आहेत आणि आता त्यांनी एका प्रोजेक्ट्साठी काम केले आहे ते ही एकत्र. ‘स्टोरीटेल मराठी’ या जगविख्यात ऑडिओबुक ऍपने खास नव्याने तयार केलेल्या त्यांच्या ओरिजनल ऑडिओबुक सिरीजमध्ये हे दांपत्य लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.’ हौस Husband’ असं नाव असलेली हि ओरिजनल धम्माल ऑडिओ सिरीज ‘स्टोरीटेल मराठी’ने तयार करून नवा पायंडा रचला आहे.
रोहित आणि रेवा. आत्ताच लग्न झालेले, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले एक नवेकोरे कपल. एकदम मी फक्त तुझाच आणि मी फक्त तुझीच अशा टाईपचे. पण त्यांच्या नवरा बायकोच्या रोलबद्दल जरा उलट्यापालट्या धारणा आहेत. पण आजूबाजूचे हे जग, हि दुश्मन दुनिया आणि काळजीवाहू समाज त्यांना हवं तसं जगू देत नाहीयेत.
घरात येणाऱ्या मदतनीस ताईंपासून ते पार्कातल्या काकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपासून ते सासवांपर्यंत. सगळे कसे मिळून या बिचाऱ्यांना मेंटल टॉर्चर करतायत. मात्र तरीही अशा वेळी त्यांची दोघांची टीम सक्षम आणि भक्कम राहते का? त्यांच्यात हि सारी माणसं आणि वृत्ती फूट पाडते का? रेवाचा स्वयंपाक आणि रोहितचा जॉब यांचं नेमकं काय होतं? या सगळ्याची एक रोमँटिक यूथफुल खिचडी अर्थात गोष्ट म्हणजेच हौस Husband’.
स्टोरीटेल हे अत्यंत लोकप्रिय ऑडिओ बुक्सचे ऍप आहे. तर चतुरस्र युवा लेखिका गौरी पटवर्धन यांच्या लेखणीतून ‘हौस Husband’ अवतरले आहे. आधीच्या दोन्ही सिरीजप्रमाणेच या सीरिजलाही साहित्यप्रेमी प्रचंड प्रतिसाद देतील असा विश्वास ‘स्टोरीटेल मराठी’ने व्यक्त केला आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून आपल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे सिद्धार्थ आणि मितालीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहेच. पण आता ते आपल्या आवाजाच्या जादूनेही रसिकांना घायाळ करणार असे दिसत आहे. या गोड, गुलाबी, आंबट, तिखट नात्याच्या सुंदर कथेचा आस्वाद घेण्यासाठी स्टोरी टेलचा भाग असणे गरजेचे आहे.
Discussion about this post