हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील बेधडक व्यक्तिमत्व असणारी लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे अनेकदा ती आपल्या चाहत्यांसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ तसेच विविध विषयावरील पोस्ट शेअर करत असते. आता अगदी काहीच दिवसांवर दिवाळी असताना तिची उत्सुकता व्यक्त करणारी एक पोस्ट तिने शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने दिवाळीच्या फराळातील तिचा आवडता पदार्थ सांगत बाकीच्यांना त्यांचा आवडता फराळाचा पदार्थ विचारला आहे.
हेमांगी कवीने नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपल्या फोटोसह तिने एक भन्नाट कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये हेमांगीला दिवाळीचे आणि बेसनाच्या लाडूचे वेध लागले आहे हे स्पष्ट समजतंय. कारण काशीफन लिहिताना हेमांगीने यात लिहिले आहे कि, ‘जर बेसन लाडू माणुस असता…? तुमचा आवडता दिवाळी फराळ कुठला..?’ या कॅप्शनवरून हेमांगीला दिवाळीच्या फराळामधील बेसनाचे लाडू प्रचंड आवडत असतील याचा अंदाज कुणीही अगदी सहज लावेल.
हेमांगीच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी दिवाळीच्या फिरतील कोणता पदार्थ आपल्याला आवडतो हे सांगितले आहे. यातील एकाने कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘आमचा स्वभाव तिखट म्हणून आम्हाला फराळ पण तिखटच आवडतो म्हणजे चकली क्रिस्पी. चहामध्ये बुडवून खाल्ली कि काय मस्त लागते.’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, चेहऱ्यावर फेसपॅक लावल्यावर अनारस्याचा फील येतो.’ तर एकाने माझा आवडता फराळ तूच अशी कमेंट केली आहे. याशिवाय बऱ्याच चाहत्यांनी आपल्यालाही बेसनचा लाडू आवडत असल्याचे म्हटले आहे.
Discussion about this post