हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच विविध विषयांवर, मुद्द्यांवर आपले परखड मत मांडताना दिसते. अशाच एका महत्वपूर्ण प्रस्तावावर हेमांगीने सवाल उठवला आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरीता त्यांना ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागीरथी’ (गं.भा.) हा शब्द वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर विविध राजकीय मंडळींनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरूनच हेमांगी कवीनेही एक प्रश्न उपस्थित केला आहे.
Maharashtra govt to use 'Ganga-Bhagirathi' to address widowed women, instead of word 'Vidhwa' being used for them. Decision of Women & Child Welfare minister Mangalprabhat Lodha welcomed by Maharashtra Women's commission chief Rupali Chakankar. pic.twitter.com/Acgtst6P72
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) April 13, 2023
अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर हि पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये हेमांगीने लिहिलं आहे कि, ‘आता विधवेला ’गंगा भागीरथी’ संबोधून आदर/सन्मान देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. असं संबोधल्यामुळे नक्की काय फरक पडेल किंवा काय बदल होतील कुणी मला नीट समजावून सांगेल का..? त. टी – हा टिंगल – टवाळीचा विषय नाही. मी प्रामाणिकपणे विचारतेय याची मंडळाने नोंद घ्यावी’. हेमांगीच्या या पोस्टवर बऱ्याच नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
या पोस्टवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ‘ही पद्धत आमच्याकडे गेली चार पिढ्या आहे. आमच्या पणजीला गं.भा. संबोधलं जायचं’. तर आणखी एकाने म्हटलं, ‘हे संबोधन आपल्याकडे अनेक वर्षांपासून आहे। अगदीच अचूक काळ नाही सांगता येणार पण तरीही १५० वर्षांहून अधिक’. अन्य एकाने लिहिले, ‘महत्त्वाच्या विषयांवरून लोकांना distract करणे याशिवाय दुसरा काहीच उद्देश नाही’.
अन्य एकाने लिहिलंय, ‘यांने काय फरक पडणार नाही किंवा कुणाचा आदर ही होणार नाही , अगदी एखाद्या गल्ली मधून ते देशाच्या न्यायमंदिरापर्यंत (संसद) पर्यंत सुद्धा वारंवार अपमानाचा गोष्टी आपण ऐकतो. आजच एका महिलेला त्यांचा पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वातर नियुक्त करम्यासाठी पैश्याची मागणी करण्याबाबद प्रकरण ऐकण्यात आलं! आपला प्रश्न खूप काही विचार करण्यास भाग पाडतो!’ एकंदरच काय तर अनेक नेटकऱ्यांनी देखील या प्रस्तावाला आपला विरोध दर्शवला आहे.
Discussion about this post