Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पायाला दुखापत.. असह्य वेदना.. तरीही प्रयोग रद्द केला नाही’; हेमांगीच्या जिद्दीने जिंकलं प्रेक्षकांचं मन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hemangi Kavi
0
SHARES
50
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हि तिच्या अभिनयसह परखड विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसतेय. दरम्यान शूटिंग सेटवर तिच्या पायाला मोठी दुखापत झाली आणि वेदनांनी कळवळत असूनही तिने शूट पूर्ण केले. इतकेच काय तर जखम चिघळली, वेदना होत होत्या तरीही हेमांगीने तिच्या नाटकाचा प्रयोग रद्द केला नाही. याबाबत तिने स्वतःच एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने पायाचा आणि प्रयोगादरम्यानचा तिचा फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

‘परवा ‘मन धागा धागा’ च्या सेटवर सीन करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात. शूटिंग थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता. Pack up ची वेळ उलटून गेली होती. म्हटलं आता जर मी माझ्या पायाला गोंजारत बसले तर जशी ती कळ माझ्या डोक्यात गेलीए तशी मी सगळ्यांच्या डोक्यात जाईन. काही नाही काही म्हणत scene पूर्ण केला. Pack up झालं. पाय झणझणत होता. चालवत ही नव्हतं. चप्पल घलता येत नव्हती. कशी बशी घरी पोचले. घरी आल्यावर बघते तर काय पाय टम्म सुजला होता. Fresh होऊन बर्फाचा शेक दिला पण मी इतकी थकले होते की मी झोपी गेले’.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

‘काही वेळापुरतीच. थोड्या थोड्या वेळाने सारखी जाग येत होती. पाय प्रचंड झोंबत होता. पण याही पेक्षा पाय जर असाच राहीला तर उद्याचा नाटकाचा प्रयोग कसा करणार या विचाराने अस्वस्थ होऊन झोपमोड होत होती. सकाळी पुन्हा बर्फ लावला. नाटकाच्या rehearsal ला पोचले. मी लंगडतेय पाहून सगळेच काळजीत पडले. माझ्याही आणि उद्याच्या प्रयोगाच्याही! तिथेही मनाचा हीय्या करून आई गं आई गं करत rehearsal केली. आराम न दिल्यामुळे जखम खवळली. आता म्हटलं हीचा दादापूता नाही केला तर ही मला उद्याचा प्रयोग करू द्यायची नाही. घरी गेल्या गेल्या मैत्रिणीने सुचवलेला तुरटी-हळदीची लेप लावला पायाला. दुखणं शांत झालं. Rehearsal चांगली झाली होती म्हणून झोप ही पटकन लागली आणि चांगली झाली. प्रयोगाचा दिवस उजाडला. रक्त साकळून बोट काळं निळं झालं होतं’.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

‘मनात म्हटलं nothing doing. काल जशी लंगडत तालिम केली तसाच आज प्रयोगही करायचा. लंगडल्यामुळे दुसरा पाय ही दुखू लागला. Theatre ला पोचले. Make up, Costume घालून ready झाले. सगळे माझ्या दुखण्याचं, लंगडण्याचं सांत्वन करत होते. मी विंगेत उभी होते. तिसरी घंटा झाली. पडदा उघडला. संगीत सुरू झालं. Lights आले आणि मी entry घेतली. Entry लाच मी धावत train पकडतेय असा scene आहे नाटकात. मी धावले आणि त्यानंतरचे २- २.१५ तास मी रंगमंचावर तरंगत होते. मला दुखापत झालीए. माझे पाय दुखताएत. हवा लागली तरी सहन होत नाहीए हे सगळं सगळं विसरून गेले मी. काय गंमत झाली? काही तासांपूर्वी विव्हळणारी मी जणू काही झालंच नाही अशी वावरले. जादू व्हावी तसं.

 

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

 

पण खरंच आहे ही जादूच असते. कलेची जादू. परकाया प्रवेशाची जादू. त्यावेळी साकारत असलेल्या पात्रामध्ये आपण उरतच नाही. त्यामुळे आपली दुःखं, यातना, क्लेश शारिरीक आणि मानसिक सुद्धा काही काही उरत नाही आपल्यात. या गोष्टीचा मला फायदा झाला. प्रयोग संपल्यावर मला जाणवलं माझं दुखणं खुप कमी झालं होतं. या क्षेत्राची मला हीच गोष्ट आवडते. वेगवेगळी characters केल्यामुळे, करताना आपल्या वैयक्तिक दुखांमधून पटकन सावरता येत आम्हांला. मला वाटतं फक्त अभिनय क्षेत्रच नाही तर जगातली कुठलीही कला तुम्हांला सावरायला मदतच करते. तिने पुढे केलेला मदतीचा हा हात धरायचा की नाही हे आपल्या हातात असतं. जन्मवारीचा’ पहीला प्रयोग माझ्या कायम स्मरणात राहील. कलादेवता, नाट्यदेवता कालच्या सारखी कृपा कायम ठेवा माझ्यावर!’. हेमांगीची हि पोस्ट पाहून तिचे चाहते तिच्या जिद्दीला सलाम करत आहेत. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत आणि सोबतच तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत.

Tags: Hemangi KaviInjured During ShootInstagram PostMarathi Actressviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group