हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। परखड आणि स्पष्ट बोलण्यासाठी हेमांगी कावीळ आढेवेढे घ्यावे कधीच लागले नाहीत. कारण हा तिचा मुळातच स्वभाव आहे आणि त्यामुळे ट्रोलिंगला घाबरेल ती हेमांगी नव्हेच. गेल्या २५ जानेवारीला शाहरुखचा पठाण रिलीज झाला आणि हेमांगीने आपली तिकीट बुक करून हा चित्रपट पाहिला नसेल तर नवल. कारण हेमांगी शाहरुख खानची फार मोठी चाहते आहे. अशातच तिने सोशल मीडियावर शाहरुखवर एक पोस्ट शेअर केली आहे. जी प्रचंड चर्चेत आली आहे.
हेमांगीने या पोस्टमध्ये शाहरुखचा फोटो शेअर केला आहे आणि सोबतच कॅप्शनमध्ये लिहले आहे कि, ‘तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. असो.’
‘मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःहाला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!! सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू जाणे! स्वतःहाच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए! पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया! तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला! बाकी… झूमे जो पठान मेरी जान, महफ़िल ही लूट जाए! तू होतास, आहेस आणि कायम राहशील.. बाज़ीगर..!’
Discussion about this post