हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने इंडस्ट्रीत आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तशीरपणामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. हेमांगी कवीच्या अभिनयाला जितकी धार आहे तितकीच धार तिच्या लेखणीला सुद्धा आहे. आतापर्यंत तिने अनेक विविध अव्यक्त विषयांना हात घातला आहे. ज्यामुळे कधी ती ट्रोल झाली तर कधी नेटकऱ्यांच्या रोषाला बळी पडली. पण याशिवाय तिने अनेक मजेशीर पोस्टदेखील केल्या आहेत. ज्यासाठी नेटकऱ्यांनी तिचे कौतुकही केले आहे. अशीच एक भन्नाट पोस्ट सध्या तिने शेअर केली आहे. हि पोस्ट हेमांगीने अधिकृत फेसबुक हँडलवर शेअर केली आहे.
हेमांगीने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘लहानपणी (अलीकडे या शब्दाचा वापर अधिक व्हायला लागलाय.. हे लक्षात आलंय माझ्या) तर माझ्या लहानपणी मला कुणी विचारलं की “तुझा आवडता रंग कुठला?” तर मी म्हणायचे ‘लाल’. ठरलेलं उत्तर. या रंगाबद्दल कधी एवढं आकर्षण निर्माण झालं माहीत नाही पण solid आवडायचा हा रंग. तुम्हांला खोटं वाटेल पण माझ्याकडे 90 % गोष्टी लाल रंगाच्या असायच्या! कपडे, पेन, शाई, दप्तर, water bottle म्हणजे u name it आणि माझ्याकडे ते लाल रंगाचं असायचं! अरे हो! रक्ताचा रंग लाल, हृदयाचं चित्र काढलं तर ते लाल, गुलाब लाल, जास्वंद लाल, प्रेमाचा रंग लाल, जगात सगळ्यात भारी रंग म्हणजे लाल असला बालिश युक्तिवाद मी मांडायचे!’
पुढे लिहिलंय कि, ‘अजूनही shopping ला गेलं की माझा पहिला हात लाल रंगाच्या वस्तू, कपड्यांकडे जातो! College ला गेल्यावर तर काय रंगच रंग, अनेक छटा, पोत पण तरीही लाल रंगाची जागा ही वेगळीच होती. काही वर्षांनी ती जागा काळ्या रंगाने घेतली. मला वाटलं चला लालचा सोस सुटला पण नाही!!! कितीही ठरवलं नाही घ्यायचा लाल रंग तरीही कुठल्या ना कुठल्या मार्गे हा लाल रंग शिरतोच माझ्या आयुष्यात! काय करणार… मेरा पेहला प्यार जो है! मित्र परिवार गमतीत म्हणतात ‘म्हणूनच तू लाला नावाच्या माणसाशी लग्न केलंस!’ असं म्हणतात लाल रंग सावळ्या रंगाला शोभत नाही! मला हे कधीच पटलं नाही! मुळात कुठलाही रंग जर आपण नीट carry केला तर तो छानच दिसतो आणि त्यात जर आपला आवडता रंग असेल तर आपण ‘कमालच’ दिसतो! हो की नाही?’ याशिवाय हेमांगीने तळटीपमध्ये लिहिले आहे कि, ‘लाल रंग म्हणजे ‘Danger’ असं ही म्हणतात याची मंडळाने नोंद घ्यावी… तेव्हा comment करायच्या आधी सावधानी बाळगा! एक निर्धारीत सूचना!’
Discussion about this post