हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत कला क्षेत्रात काल अचानक वादळ आलं आणि या वादळात आणखी एक सूर हरवला. बॉलीवूडमध्ये ९०च्या काळापासून प्रेम आणि मैत्री या दोन नात्यानं अल्लग ऊर्जा देणारा प्रसिद्ध गायक केके (KK) वयाच्या ५३ व्या वर्षीच जगाचा निरोप घेऊन मोकळा झाला. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हृद्यविकाराचा तीव्र झटका आल्यामूळे त्याच असता असता अचानक नसणं अत्यंत वेदनादायी ठरलं. हि वेदना हि सल त्याच्या चाहत्यांच्या आणि संपूर्ण कला सृष्टीच्या मनात कायम राहील अशी आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये फक्त सर्वसामान्य लोक नव्हतेच कधी. तर त्याचे चाहते विविध क्षेत्रातील दिग्गजही आहेत. आज त्या प्रत्येकाला आयुष्यातील हरवलेला काळ पुन्हा देणारा तो स्वतःच हरवल्याचे दुःख असहनीय झाले आहे. केकेच्या निधनाने भावुक झालेल्या हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी वाचणाऱ्याच्या डोळ्यात अगदी टचकन पाणी आणेल.
आतापर्यंत केकेच्या निधनावर अनेक बॉलीवूड-मराठी-साऊथ इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी आपापल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट, ट्विट शेअर करीत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी खूप लवकर गेलास, तुझं नसणं आम्हाला मान्यच नाही, एक रोमॅंटिक आवाज हरवला, ‘संगीत क्षेत्रासाठी काळा दिवस अशा विविध प्रतिक्रिया देत आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत. यातच आता हेमांगीने ९०च्या काळातील आपण आणि केकेची गाणी यांची सांगड घालणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
He said “mai mar jaau yahin pe” and the shitty thing happened there. Can’t believe this
Om shanti #kk #KKLIVE #kk #KKsinger #RIPKK #RIPKK #RIPLegend pic.twitter.com/PtcGW7IF9A— Ankit Tiwari (@officiallyAnkit) June 1, 2022
हेमांगी कवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि ती विविध विषयांवर व्यक्त होते. पण आज बेधडक, बिंधास्त बोलणारी व्यक्त होणारी हेमांगीसुद्धा भावुक झाली आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिने केकेच्या आठवणीत हि भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्याला सोडून गेलेल्या केकेला ‘Not Fair’ असंदेखील म्हटलं आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने KKचा गाजलेला नव्वदीचा काळ आणि तिच्या आठवणींना उजाळा दिलाय तर यमाला माफ करणार नाही असेही म्हटले आहे.
And this was the last song from today's concert in Kolkata 💔@K_K_Pal #KKLIVE #RIPKK pic.twitter.com/zl7Pfl0jA4
— Antora Banerjee (@AntoraBanerjee1) May 31, 2022
हेमांगीने शेअर केलेल्या या भावनिक पोस्टमध्ये तीने लिहिलं आहे कि, ”मैत्रीचा, प्रेमाचा सुंदर आवाज गेला! शाळा संपून college मधल्या नवनवीन हवेत ”यारों दोस्ती बडी ही हसीन है आणि पल’ या गाण्यांवर तरंगायला लागलो. पण कालच्या बातमीने जमिनीवर धापकन खाली पडल्यासारखं झालं. 90s मधल्या लोकांना कळेल मी काय म्हणतेय ते. काही काही गाण्यांनी, आवाजांनी आपल्या आयुष्यातल्या काही क्षणांना व्यापून टाकलेलं आहे. ते गाणं, तो आवाज ऐकला की आपण पुन्हा त्या काळात जातो, time travel सारखं. काल रात्री ते सगळं गोठलं. सुन्न झालं. आमच्या मैत्रीचा, प्रेमाचा बेगरज राजदार अचानक असा घेऊन गेलास, यमा तुला आम्ही कधीच माफ करणार नाही!”
Discussion about this post