हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय, बेधडक आणि बिनधास्त अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या हेमांगी परदेशवारी करून आली आहे. त्यामुळे भारी उत्साहात आहे. या टूरचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते आणि सोबत कॅप्शनही दिले होते. तिच्यासाठी हे कॅप्शन भारी होतं. पण कुणास ठाऊक होत कि, हे कॅप्शन तिला नेटकऱ्यांच्या रोषाकडे नेईल. परदेशात फोटो चांगले आणि क्लिअर येतात असे म्हटल्यामुळे हेमांगीला प्रचंड ट्रोल केलं गेलं. इतकंच नव्हे तर सध्या बॉयकॉट आणि बॅनचा ट्रेंड सुरु आहे. यावरूनही एका नेटकऱ्याने हेमांगीला डिवचलं आहे.
हेमांगीचा रोखठोकपणा सगळ्यांनाच आवडतो. पण तिचा रोखठोकपणा आगाऊपणाकडे वळला कि मग नेटकऱ्यांचाही बोलायचा रोख बदलतो. यावेळी तसाच झालं. हेमांगीचे आपला फोटो शेअर करत लिहिलं कि, ‘बाहेरच्या देशांमध्ये काढलेले फोटोज जास्त क्लिअर आणि क्लीन येतात. आपल्या आणि आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये पोल्युशनचा थर नसावा म्हणून असेल का.. ?’ इतकंच नव्हे तर यासोबत एक तळटीप लिहीत ती म्हणतेय कि, ‘सहज एक ऑबझर्व्हेशन आहे, कुठला महान शोध लावल्याचा दावा अध्यक्ष करत नाहीयेत याची मंडळाने नोंद घ्यावी. आपल्या देशातल्या पोल्युशनला मी ही कारणीभूत आहे याची मला जाणिव आहे.’
हि एव्हढीच पोस्ट ट्रोलिंगसाठी पुरेशी ठरली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘तुला पण बॅन मोहीम चा भाग होईचे आहे का?’ यावर हेमांगी म्हणाली कि, ‘मी या post मध्ये आपल्या देशाला नावं ठेवली आहेत का? कमी लेखलंय का? उगाच कश्याला ही काही जोडत बसता! खरंच धन्य आहोत आपण!’ यावर पुन्हा त्या नेटकऱ्याने लिहिले कि, ‘आपल्याला आपल्या उणीवा दाखवल्या की आपला देशाभिमान जागृत होतो .. जो पर्यंत अशी महामूर्ख जमातीचे डोकी ठिकाणावर येतं नाहीत तेवढा आपल्याकडे चांगले बदल होण्यासाठी उशिर होईल..’
तर यावरच प्रकरण थांबलं नाही. पुन्हा हेमांगीने रिप्लाय देत म्हटलं कि, ‘याचा अर्थ आपल्या कडे pollution ची एक layer असते म्हणून clear photos येत नाहीत. एवढंच!’ याशिवाय आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय कि, ‘तुझ्या फोटोत नाही तर तु वापरलेल्या शब्दामुळे तुझ्या पोस्ट मध्ये Pollution वाढलेय… काळजी घे बाई..’
Discussion about this post