हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवीने एखादी पोस्ट शेअर केली आणि ती व्हायरल होऊन चर्चेत आली नाही तर नवलंच! अशीच एक तिने तिच्या दुर्गेसाठी केलेली पोस्ट प्रचंड चर्चेत राहिली होती. ज्यामध्ये तिने कॅप्शन लिहिताना दुर्गा म्हणून उल्लेख केलेल्या त्या स्त्रीचा चेहरा दाखवला नव्हता. तो चेहरा तिनं शनिवारी दाखवला. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता आणि यानिमित्त हेमांगीने तिच्या आयुष्यातील दुर्गा दुसरी तिसरी कुणी नसून सुष्मिता असल्याचे सांगितले. एका खास पोस्टसह तिने सुष्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण यानंतर मात्र सोशल मीडियावर नेटकरी तिला ट्रोल करताना दिसले. ज्यामुळे हेमांगीने हि पोस्ट डिलीट केली आहे.
हेमांगीने सुष्मिता सोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिला ‘दुर्गा’ म्हटलं होतं जे नेटकऱ्यांना खटकलं. यावरून नेटकऱ्यांनी हेमांगीची शाळा घेतली. या पोस्टमध्ये हेमांगीने ‘हॅप्पी बर्थडे माय दुर्गा’ असं लिहिलं होतं. याआधी हेमांगीने सुष्मितासोबतच्या भेटीचा फोटो शेअर करत लिहिलं होतं की, ‘काल मला माझी दुर्गा भेटली. दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी माणसांमध्ये देव शोधते आणि मला भेटतात ही. रवी सरांच्या आगामी web series मध्ये मी जिच्यासोबत काम करतेय ती माझ्यासाठी दुर्गाच आहे. एका अर्थी आज मी जिथे आहे ते तिच्या मुळेच! योग्य वेळ आल्यावर सांगेनच कसं ते!’
रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ या वेबसिरिजमध्ये सुष्मिता सेन तृतीयपंथी गौरी सावंत यांची भूमिका साकारतेय. या वेबसिरीजमध्ये हेमांगीदेखील महत्वाच्या भूमिकेत आहे. या सिरीजदरम्यान आलेल्या अनुभवांवरून तिने सुष्मिताला दुर्गा म्हटलं आहे. दरम्यान तिने शेअर केलेल्या व्हिडिओत ती सुष्मिताला फुलं देऊन तिच्या पायावर डोकं ठेऊन तिला नमस्कार करताना दिसली हे पाहून नेटकरी अधिकच संतापले. नेटकऱ्यांनी सुष्मिताच्या खाजगी आयुष्यवर टिपण करत हेमांगीला ट्रोल केले आहे. सुष्मिताचे पूर्वायुष्य पाहिलॆ तर तिने आजवर लग्न केलेले नाही पण तिचे अनेक बॉयफ्रेंड झाले आहेत. कदाचित दहाहून अधिकच. यातच अलीकडे ती मनी लाँड्रींग प्रकरणात अडकलेल्या ललित मोदीसोबतसुद्धा रिलेशनमध्ये असल्याचे समोर आले.
यावरून एका नेटकऱ्याने म्हटले कि, ‘हेमांगी कवी.. तुमच्या अभिनयाचा मी जबरदस्त फॅन आहे. तुम्ही कोणीतही भूमिका सहज पेलता. पण दोन दिवसांपूर्वी एक फोटो पाहिला. एक हिंदी बी ग्रेड अभिनेत्री समोर तुम्ही नतमस्तक होऊन तिला दुर्गाचा मान दिला. ती अभिनेत्री तुमच्यापेक्षा अभिनयात कच्ची आहे. लफडेबाज.. अव्वल.. गौरी सावंतची भूमिका तिच्यापेक्षा तुम्ही उत्तम निभावली असती. पण हिंदी चित्रपट किंवा वेब सिरिज बोलली की हिंदी स्टार लागतात. ही आपल्या मराठी निर्माते आणि दिग्दर्शक यांचे विकृत कारनामे आहेत. पण प्लीज.. कोणापुढे स्वाभिमान घाण ठेवू नका..’ यावर हेमांगीने प्रत्युत्तर तर दिले. पण इतरही अनेकांच्या अशाच कमेंट येऊ लागल्याने तिने ही पोस्ट डिलीट केली आहे. (हि पोस्ट डिलीट केल्यामुळे बातमीतून दाखवता आलेली नाही.)
Discussion about this post