Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी; बुकिंग घेऊन ‘सनी’चे शो परस्पर केले रद्द

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 21, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
SUNNY
0
SHARES
168
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहे. पण कुणी प्रगती करत असेल तर कुठे ना कुठे कुणी ना कुणी धुमसत असतंच. आजकाल कुणाची प्रगती कुणाचं दुःख होईल सांगता येत नाही. अशातच मराठी दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा ‘सनी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

या चित्रपटाचे प्रिरिलीज शोपासून ते प्रीमिअरपर्यंत आणि विकेंडचे अनेक शो हाऊसफुल झाले. पण राज्यातील अनेक भागात शोची बुकिंग घेऊन नंतर परस्पर रद्द केल्याचा प्रकार घडला आणि यावरून प्रेक्षक संतापले. प्रेक्षकांनी थेट हेमंत ढोमेसोबत संवाद साधला.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

मराठी चित्रपट चालत नाहीत.. प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत आणि म्हणून आम्हाला शो रद्द करावा लागतो, अशी अनेकदा थिएटरवाल्यांची तक्रार असते. पण जर प्रेक्षक येऊनही शो रद्द होत असेल तर..? हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि हा असाच प्रकार घडलाय हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ चित्रपटाच्या बाबतीत. होय.

पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी… या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय! लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शोज कॅन्सल केले जात आहेत!
मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच! pic.twitter.com/Pj0b023E3Q

— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 20, 2022

नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामुळे प्रेक्षक ऑनलाईन बुकिंग करून हा चित्रपट पाहताना दिसत आहेत. असे असताना कल्याणमधील एका थिएटरमध्ये ‘सनी’चे बुकिंग तर घेतले पण ऐनवेळी शो रद्द करण्यात आला आहे असे थिएटरकडून परस्पर कळवण्यात आले. यामुळे नाराज प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे थेट हेमंत ढोमेशी संपर्क साधला.

आपल्या अजुन एका प्रेक्षकासोबत देखील तोच प्रकार घडला… तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आलाय… SM5 kalyan मधला हा प्रकार… प्रेक्षक जात असुन देखील सिनेमा असा डावलला जाणं चुक की बरोबर? pic.twitter.com/91v8SFrbsi

— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 20, 2022

मुख्य म्हणजे हा संतापजनक प्रकार केवळ एकाच ठिकाणी घडला नसून राज्यात अनेक ठिकाणी घडला आहे. अर्थात ‘सनी’चे बरेच शोज अचानक रद्द करण्यात आले आहेत. याबाबत चित्रपट दिग्दर्शक हेमंन ढोमेने नाराजी व्यक्त केली. हेमंत ढोमे म्हणाला कि, ‘थिएटरला प्रेक्षक येत नाहीत म्हणून शो रद्द करणे, कितपत योग्य आहे..?

सरकार, आम्ही चित्रपट बनवणारे, थिएटर वाले, प्रेक्षक… सगळेच जबाबदार आहेत या उदासीनतेसाठी! पण नियम तर केलेच पाहिजेत… त्याशिवाय हे चित्र बदलणार नाही…

— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 20, 2022

एक प्रेक्षक जरी आला तरी शो दाखवला गेला पाहिजे. बुकिंग घेऊन नंतर प्रेक्षकांना शो रद्द झाल्याचे सांगून त्यांना पैसे देणे, हे चुकीचेच आहे. मग आपण प्रेक्षकांना तरी दोष कसा द्यायचा..? काही प्रेक्षकांनी हे आमच्या निदर्शनास आणून दिल्याने हा प्रकार आम्हाला कळला. हे असेच सुरू राहिले तर चित्रपट चालणार कसे..?’

मराठी सिनेमाला महाराष्ट्रात किमान एक आठवडा सुद्धा थेटर मिळू नयेत हे खरोखर दुर्दैव आहे!! हिंदी सोबत स्पर्धा करण्यासाठी आधी उभं तर राहू दिलं पाहिजे मराठी सिनेमांना! या बद्दल खरोखरीच कायदा हवा!! https://t.co/J1vOKF2VRo

— Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन (@Kshitij_P) November 21, 2022

आता यावर कोण आणि कसा पर्याय काढणार हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र एक नक्की कि, हा प्रकार असाच सुरु राहिला तर ओटीटी माध्यमांना थिएटरची जागा घ्यायला वेळ लागणार नाही.

Tags: Hemant DhomeLalit Prabhakarnew Marathi movieSunnyTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group