Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बरोबर 1 वर्षाने.. त्याच शुक्रवारी..; हेमंत ढोमे घेऊन येतोय ‘आनंदाचा खेळ’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Sunny
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षी कोरोनाचे नियम हटविल्यानंतर १९ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘झिम्मा’ हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. यानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमे या वर्षात पुन्हा त्याच शुक्रवारी आणखी एक खळखळून मनोरंजन करेल असा सिनेमा घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘सनी’ आहे. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर हा ‘सनी’ची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस आणि उर्फी काझमी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित हे सह-निर्माते आहेत आणि लेखन इरावती कर्णिक यांचे आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

अभिनेता हेमंत ढोमेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करीत त्याने कॅप्शन लिहिले आहे. या कॅप्शनमध्ये हेमंतने लिहिले कि, ‘गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर २०२१ ला.. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो… झिम्मा!!! आता बरोबर एक वर्षाने… त्याच शुक्रवारी… पुन्हा आनंदाचा खेळ… तुमच्या जवळच्या माणसांकडून… जवळच्या चित्रपटगृहात!’. ‘सनी’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आपण अभिनेता ललित प्रभाकर याला पाहू शकतो. अत्यंत आनंदी असं हे पोस्टर आहे आणि यावर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

क्रेझी फ्यु फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा आगामी मराठी चित्रपट येत्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला कि, ‘झिम्मा’ ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर प्रेक्षकांशी एक वेगळं नातं तयार झालंय आणि त्या आपुलकीच्या नात्यानेच आम्ही जबाबदारीने ‘सनी’ हा सिनेमा घेऊन आलोय. आपल्या आयुष्याबद्दल चांगलं वाटायला लावणारी ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना प्रचंड आनंद होतोय. प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे ‘झिम्मा’ला प्रेम दिले तसेच ते ‘सनी’ला हि मिळेल अशी खात्री आहे.’

Tags: Hemant DhomeInstagram PostLalit PrabhakarPoster ReleasedUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group