हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. विविध चित्रपट आणि चित्रपट सृष्टीसंबंधित कोणत्याही प्रश्नांवर बेधडक बोलण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करतो. यामुळे अनेकदा त्याने शेअर केलेली पोस्ट हि चर्चेचा विषय बनताना दिसते. हेमंत ढोमे एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता देखील आहे. त्यामुळे एखाद्या कलाकृतीविषयी त्याने दिलेली प्रतिक्रिया हि मोलाची मानली जाते. आज प्रदर्शित झालेला ‘वाळवी’ हा चित्रपट पाहून हेमंतने आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
अलीकडेच हेमंतचा ‘सनी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला स्क्रीन्स मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे हेमंतने संताप व्यक्त केला होता. अशाप्रकारे मराठी चित्रपटांची गळचेपी होऊ नये म्हणून अनेकदा तो आवाज उठवताना दिसतो. शिवाय विविध कलाकृतींचे नेहमीच भरभरून कौतुक करत असतो. त्याने नुकतीच ‘वाळवी’ चित्रपटासाठी एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे कि, ‘एक असतो मराठी सिनेमा आणि दुसरा असतो वाळवी! म्हणजे अतिशय सकस आणि चांगला सिनेमा! मराठीत वेगळे प्रयोग होत नाहीत, सकस पटकथा नसतात… कलाकारांची तद्दन विनोदी तिच तिच कामं असतात… शुटींगचा दर्जा फारच सुमार असतो, साऊंड वगैरे तर बोलायलाच नको नाही का? प्रेक्षकांच्या या आणि अशा अनेक प्रश्नांना कडक दर्जाचं उत्तर म्हणजे आमचा सिनेमा ‘वाळवी’’
पुढे लिहिलंय कि, ‘मी टिमचा भाग नसुनही आमचा म्हणतोय कारण आम्हा सगळ्या कलाकारांना अभिमान वाटावा असा झालाय हा सिनेमा! असे सिनेमे जमून यायला लागते ती एक दर्जेदार टीम! एका कोणाचं नाव घेणं म्हणजे बाकी टिमवर अन्याय आहे… वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम ठोकलंय एवढंच म्हणेन!” ”मी काही समिक्षक नव्हे, मी मराठी सिनेमाचा चोखंदळ प्रेक्षक म्हणून तुम्हाला हक्काने सांगतोय!वा ळ वी… ब घा च!!! वाळवी तुमचं मनोरंजन करणारच! तुम्हाला मजा येणारच!” परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा चित्रपट १३ जानेवारी, २०२३ रोजी शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात स्वप्निल जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे अशी स्टारकास्ट आहे.
Discussion about this post