Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘क्षणभर विश्रांती’ चित्रपटाला 13 वर्ष पूर्ण; ‘ती’ पोस्ट शेअर करत हेमंत ढोमे झाला व्यक्त

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2023
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kshanbhar Vishranti
0
SHARES
204
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन अशा तीनही टप्प्यांवर उत्तम कामगिरी करत हेमंत ढोमेने प्रेक्षकांना नेहमीच एक चांगली कलाकृती दिली आहे. हेमंत ढोमेने साकारलेल्या भूमिका आणि दिग्दर्शित केलेले चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरतात. अलीकडेच त्याचा ‘सातारच सलमान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर लवकरच त्याचा ‘झिम्मा २’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आज हेमंत ज्या चित्रपटातून लेखक म्हणून उदयास आला त्या ‘क्षणभर विश्रांती’ने १३ वर्ष पूर्ण केली आहेत. यानिमित्त हेमंतने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

हेमंत ढोमेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातील हेमंत आणि कादंबरी नाईकमधील एक सीन आहे. या व्हिडिओसोबत हेमंत ढोमेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘ ‘क्षणभर विश्रांती’ या माझ्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शनानंतर नाही तर टिव्हीवर ओटीटीवर आल्यावर सुपरहिट होतात! आपल्या या सुपरहिट सिनेमाला आज १३ वर्ष झाली प्रदर्शित होऊन! आजही लोक भेटतात, प्रेमाने बोलतात! हा चित्रपट मला लिहीता आला, त्यात काम करता आलं आणि खूप साऱ्या गुणी मित्रांसोबत काम करता आलं… कमाल! तुमचं प्रेम असंच राहूदे! धन्यवाद माझी संपूर्ण टिम आणि धन्यवाद प्रेक्षक!’

‘क्षणभर विश्रांती’ हा चित्रपट १३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि प्रचंड गाजला. अगदी नावाप्रमाणे हा चित्रपट प्रेक्षकांना क्षणभर विश्रांती देऊन गेला. हा चित्रपट अभिनेता आणि लेखक म्हणून हेमंत ढोमेच्या कलागुणांची प्रेक्षकांवर एक छाप सोडून गेला. त्याचा लेखक म्हणून पहिलाच चित्रपट असूनही तो चांगलाच गाजला. या चित्रपटाची कथा, गाणी, कलाकारांचे अभिनय सगळंच अप टू द मार्क होत. या चित्रपटात हेमंत ढोमे, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, भरत जाधव, कादंबरी नाईक, पूजा सावंत, सोनाली कुलकर्णी, शुभांगी गोखले हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने केवळ हेमंतला नव्हे तर प्रेक्षकांना देखील काही गोड आठवणी दिल्या आहेत.

Tags: Bharat JadhavHemant DhomeInstagram PostManava Naikmarathi actorMarathi Moviepooja sawantSachit PatilSiddharth Jadhavsonalee kulkarniViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group