हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साहजिकच बिग बॉस सुरु आहे म्हणजे रोज राडे, भांडण, हमरी तुमरी १००% होणार. पण कधी कधी या स्पर्धकांचा स्वतःवरचा ताबा सुटतो. यामुळे बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यच नव्हे तर टीव्हीवर त्यांना पाहणारे प्रेक्षकही घाबरतात. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु आहे. या पर्वत कुठे मस्ती, कुठे दोस्ती तर कुठे कुस्ती पहायला मिळते आहे. यावेळी घरात कॅप्टन्सी कार्यादरम्यान असा काही राडा झाला कि, एका स्पर्धकाला स्वतःचा राग आवर्तच आला नाही. हा स्पर्धक दुसरा तिसरा कुणी नसून योगेश आहे.
या घरात अनेकांची मैत्री झाली तर अनेकांचं ३६ चा आकडा. आता या घरात तिसरा आठवडा सुरु झाला आहे. तर घराला चालवायला कॅप्टनची गरज आहे. म्हणूनच बिग बॉसने स्पर्धकांना तिसऱ्या आठवड्यात एक कॅप्टन्सी कार्य सोपविले. आता कोण होणार कॅप्टन..? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले असताना या कार्यात मोठं वादळ आलं. कॅप्टन्सीसाठी ‘वाजवा रे वाजवा’ हे भन्नाट कार्य बिग बॉसने दिले. या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये भांडणं झाली. योगेश आणि मेघा यांनी संपूर्ण कार्याचा विचका केला असे म्हणायला हरकत नाही.
‘वाजवा रे वाजवा’ या कॅप्टन्सी कार्याची स्पर्धकांनीच वाजवली. या कार्यादरम्यान शाब्दिक चकमक, वाद, भांडणं आणि अगदी मारामारी पर्यंत प्रकरण गेले. यामध्ये इतर सदस्यांशी वाद घालताना योगेशचा पारा प्रचंड वाढला आणि मेघासोबत तो भिडला. मेघा ताई म्हणाल्या कि, ‘अरे तुझं डोकं गुडघ्यात… दोन्ही गुडघ्यात आहे ते सांभाळून ठेव मेंदू तुझा…’ यावर योगेशने एकही मिनिट न घालवता तोडीस तोड उत्तर दिले. यावर अपूर्वा म्हणाली, याचे जेवढे वयं नाहीये ना तितकं तिचं करिअर आहे. यानंतर योगेश आणि इतर सदस्यांमध्ये वाद झाला आणि योगेशने राग अनावर झाल्याने घरातील सामानाची तोडफोड केली. दरम्यान प्रोमोमध्ये तो खुर्ची आपटताना दिसत आहे. यानंतर तो मेघाच्या अंगावर धावूनही गेला. योगेशला शांत करण्यासाठी सगळे धावले मात्र तो काही शांत झाला नाही.
Discussion about this post