हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुम्ही ‘विक्रम वेताळ’ची प्राचीन कथा तर ऐकलीच असेल. या कथेतला विक्रम आणि वेताळ दोघंही आपापल्या ठिकाणी योग्य तर कधी चुकीचे होते. असेच आहेत विक्रम आणि वेधा. कधी योग्य तर कधी पूर्ण चुकीचे. हि गोष्ट आहे त्या दोघांची जे दोघेही चांगले वाटतात पण वेधा म्हणतो आम्ही दोघेही वाईट आहोत. २०१७ साली सुपरहिट ठरलेला तमिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’ याचा हिंदी रिमेक लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेता हृतिक रोशन दिसणार आहेत. नुकताच याचा टिझर रिलीज झाला असून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. यानंतर अखेर आता या थरारक आणि रोमांचक ऍक्शन चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेता सैफ अली खान पोलिसांच्या म्हणजेच माधवनने साकारलेल्या विक्रमच्या भूमिकेत दिसतो आहे. त्याचा लूक, ऍक्शन, स्टाईल सगळंच कमालीचं आहे आणि तो टीझरमध्येच एव्हढं लक्ष वेधून घेतोय तर चित्रपटात काय कमाल केली असेल असा सवाल पडतोय. याशिवाय अभिनेता हृतिक रोशन गँगस्टर वेधाच्या भूमिकेत दिसतोय. हि भूमिका विजय सेतुपतीने साकारली होती आणि हृतिकचा नुसता लूकसुद्धा त्याची आठवण करून देत आहे. कमालीचे डायलॉग, कमालीचं पार्श्व संगीत एकीकडे चतुर गँगस्टर तर दुसरीकडे धडाडीचा पोलीस अधिकारी आणि एक गोष्ट. या विक्रम वेधाची गोष्ट आधुनिक आहे पण लक्षवेधी आहे असे या टीझरमध्ये दिसत आहे.
‘विक्रम वेधा’ हा चित्रपट २०१७ साली तमिळ भाषेत रिलिज झाला होता. यानंतर आता २०२२ मध्ये या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात आला आहे. या सुपरहिट तमिळ कलाकृतीत अभिनेता आर माधवनने तडफदार पोलीस अधिकाऱ्याची अर्थात ‘विक्रम’ची भूमिका साकारली होती. तर अभिनेता विजय सेतुपतीने गँगस्टर वेधाची आव्हानात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर- गायत्री यांनी केले होते. तर आता हिंदी रिमेकचे दिग्दर्शन देखील त्यांचेच आहे. हा चित्रपट ज्यांनी तमिळ भाषेत किंवा हिंदी डबमध्ये पाहिला आहे त्या प्रेक्षकांसाठी येऊ घातलेल्या हिंदी रिमेकचे परीक्षण करणे फार सोपे असणार आहे. तर मनावर कोरलेल्या ‘विक्रम वेधा’ची जागा घेण्यासाठी सैफ आणि हृतिकला खूप कष्ट आहेत हे नक्की.
Discussion about this post