हॅलो बॉलीवूड ऑनलाईन ।ऍमेझॉन प्राइम व्हिडिओने आज पॅरासाईटच्या भारतात विशेष डिजिटल पदार्पणाची घोषणा केली, ज्याने ऑस्कर २०२० मध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकून इतिहास रचला. बोंग जॉन हो लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात ‘दि पार्क्स’ या श्रीमंत कुटुंबाचे सेवक होणाऱ्या ‘दी किम्स’ या गरीब कुटुंबाचे चित्रण केले आहे. परंतु जेव्हा त्यांची फसवणूक होते तेव्हा त्यांचे साधे जीवन जटिल होते. प्राइम मेम्बर्स आता या पुरस्कारप्राप्त कोरियन भाषेतील या चित्रपटाचे इंग्रजी उपशीर्षकांसह २७ मार्च २०२० पासून आनंद घेऊ शकतात. भरपूर वाहवा झालेला आणि बरेच पुरस्कार मिळविणारा हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ प्राइम व्हिडिओ इंडियावर हिंदी डबिंगमध्ये उपलब्ध होईल.
पॅरासाईट हा वर्ष २०१९ मधील सर्वोच्च मानांकित आणि समीक्षकाद्वारे प्रशंसित चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामुळे त्याचे लेखक-दिग्दर्शक बोंग जून-हो यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल पटकथा आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट हे चार पुरस्कार जिंकले आहेत. दक्षिण कोरियाच्या दिग्दर्शकाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळविणारा पहिला चित्रपट आणि मुख्यतः आशियाई कलाकार असलेला हा पहिला चित्रपट आहे.पॅरासाईट भारतात प्राइम मेम्बर्ससाठी थियेट्रिकल रिलीज ३१ जानेवारी, २०२० रोजी काही महिन्यांतच उपलब्ध झाली आहे.