हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि बऱ्याच मोठ्या इवेंट्सना जगभरात तहकूब करण्यात आले आहेत. बातमीनुसार ‘मेट गाला’ देखील त्याच इवेंट्सपैकी एक आहे. हा जगातील सर्वात मोठा फॅशन कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम ४ मे रोजी होणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे या इवेंट्सची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनाससुद्धा २०१७ मध्ये याच मेट गाला इवेंट्समध्ये भेटले होते. या कार्यक्रमानंतर त्यांच्यात मैत्री आणि रिलेशनशिपच्या बातम्या आल्या होत्या .कोरोना विषाणूमुळे ज्या संग्रहालयात हा कार्यक्रम होणार होता तो ४ एप्रिलपर्यंत बंद आहे. मेट गाला सोबतच ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ रद्द केल्याच्या बातम्याही आहेत.
सोमवारी रात्री, कार्यक्रमाचा आयोजक आना विंटूरने घोषित केले की यावर्षी ४ मे रोजी होणारा मेट गॅला कार्यक्रम कोरोना विषाणूमुळे पुढे ढकलला जात आहे. रविवारी, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने शिफारस केली आहे की विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून पुढच्या आठ आठवड्यांसाठी कोणत्याही कार्यक्रमात ५० हून अधिक लोक उपस्थित नसावेत.यावर्षी मेट गालाच्या ह्या कार्यक्रमाला मेरेल स्ट्रीप, एम्मा स्टोन आणि लिन-मॅन्युअल मिरांडा होस्ट करणार होते.