हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच चर्चेत आहे. यानंतर आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री चर्चेत आले आहेत. ताजे कारण म्हणजे अग्निहोत्रींना Y-दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आता ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरीही त्यांच्यासोबत सीआरपीएफची सुरक्षा त्यांच्यासोबत असेल. हि सुरक्षा त्यांना गृह मंत्रालयाकडून प्रदान करण्यात आली आहे.
‘द काश्मीर फाईल्स’च्या प्रदर्शनानंतर इंटेलिजन्स ब्युरोच्या थ्रेट परसेप्शन रिपोर्टच्या आधारावर गृहमंत्रालयने विवेक यांना ही सुरक्षा दिली आहे. ते भारतात कुठेही गेले तरी त्यांच्यासोबत CRPFचे जवान असतील. या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठवडाभरातच 97.30 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटावरून दोन गट तयार झाले आहेत. एक गट या चित्रपटाचं समर्थन करतोय तर दुसरा गट विरोध करतोय.
आपल्या देशातील सुरक्षा यंत्रणेच्या विविध श्रेणी आहेत. एखाद्या व्यक्तीला असलेला धोका लक्षात घेऊन त्यादृष्टीने सरकार आणि पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते. एखाद्याला कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरविली जावी यासंदर्भात गुप्तचर विभागाच्या अहवालाच्या आधारे त्याचं मूल्यांकन केलं जातं. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळतेय. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
Discussion about this post